पुण्याच्या नगरसेवकानं केली घाणेरडी मागणी, तेजस्विनी पंडितचा धक्कादायक खुलासा
By : Polticalface Team ,20-12-2022
मुंबई : अभिनेत्री तेजस्विनी पंडित आपल्या अभिनयासह बोल्ड अंदाजाने प्रेक्षकांना नेहमीच घायाळ करत असते. मात्र आता तेजस्विनी पंडितने एक धक्कादायक खुलासा केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तीने आपल्या करिअरच्या सुरूवातीला आलेला एक अनुभव सांगितला की, आपल्या करिअरच्या सुरूवातीला ती पुण्यात एका फ्लॅटमध्ये राहत होती तो फ्लॅट एका नगरसेवकाचा होता.
तेजस्विनी पंडितने हा धक्कादायक खुलासा करताना म्हटले की, या नगरसेवकाच्या फ्लॅटचे भाडे देण्यासाठी मी त्याच्या ऑफिसमध्ये गेले होते त्यावेळी त्याना माझ्याकडे घाणेरडी मागणी केली. मात्र यावेळी मी त्याच्या टेबलवर असलेला पाण्याने भरलेला ग्लास त्याच्या चेहऱ्यावर फेकला. त्याला खडसावले की, असंच मोठ व्हायचं असतं तर मी भाड्याच्या घरात राहिले नसते. करिअरच्या सुरूवातीलाच माझ घर झालं असतं.
एका सिनेपत्रकाराच्या पॉडकास्टमध्ये बोलताना तेजस्विनी पंडितने हा धक्कादायक खुलासा केला. करिअरच्या सुरुवातीला 2009-2010 साली ती पुण्यात सिंहगड रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होती.
तेजस्विनीने 2004 साली केदार शिंदेंच्या अगं बाई अरेच्चा या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर तिने मी सिंधुताई सपकाळ,तू ही रे, देवा, एक तारा अशा गाजलेल्या सिनेमांत काम केलं. एकाच या जन्मी जनू, लज्जा या मालिकांमध्येदेखील तिने काम केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तेजस्विनीची रानबाजार ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. लवकरच ती अथांग या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. तिची बांबू या सिनेमाची ती निर्मिती करणार आहे. तेजस्विनीच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी