परळीत धनंजय मुंडे गटाला यश, ढोल ताशाच्या गजरात जल्लोष

By : Polticalface Team ,20-12-2022

परळीत धनंजय मुंडे गटाला यश, ढोल ताशाच्या गजरात जल्लोष बीड : परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर यश मिळताना दिसत आहे. धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात मोठा विजयोत्सव करण्याची तयारी करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी स्टेज करण्यात आले आहे. त्याचबरोबर डॉल्बी आणि ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्ते आपला आनंदोत्सव साजरा करत आहेत. त्याचवेळी धनंजय मुंडे यांचे चुलत भाऊ अभय मुंडे 648 मतांनी नाथरा (परळी) ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाले आहेत.

मतदारसंघातील बहुतांश ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे समर्थक उमेदवार विजयी झाले आहेत किंवा आघाडीवर असल्याचे प्राथमिक फेरीत दिसून येत आहे. जिल्ह्यात 34 ग्रामपंचायती निवडणुकीपूर्वीच बिनविरोध निवडून आल्यानं उर्वरित 670 ग्रामपंचायतींसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. 670 सरपंच पदासाठी जिल्ह्यात 1 हजार 932 उमेदवार निवडणूक लढवली तर ग्राम पंचायत सदस्यपदासाठी 2 हजार 107 जागांसाठी 12 हजार 219 उमेदवार आपलं नशिब आजमावत आहेत. जिल्ह्यात 185 मतदान केंद्र संवेदनशील असून अन्य काही केंद्र अतिसंवेदनशील होती.

गोपीनाथ गड असलेली परळी तालुक्यातल्या पांगरी गावची ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आली आहे. या ग्रामपंचायतीमधील 11 पैकी 10 जागा धनंजय मुंडे यांनी बिनविरोध आपल्या ताब्यात घेतल्या असून सुशीला कराड यांची सरपंचपदी निवड झाली आहे. बिनविरोध ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून मोठा जल्लोष साजरा केल्याचं दिसून आलं

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष