सम्मेद शिखरजी पर्यटन क्षेत्र रद्द करा, जैन समाजाची मागणी ,उद्या करमाळ्यात निघणार भव्य मोर्चा

By : Polticalface Team ,20-12-2022

सम्मेद शिखरजी पर्यटन क्षेत्र रद्द करा, जैन समाजाची मागणी
,उद्या करमाळ्यात निघणार भव्य मोर्चा करमाळा प्रतिनिधी झारखंड झारखंड राज्यातील श्री सम्मेद शिखरजी हे जैन धर्मियांचे प्राचीन तीर्थक्षेत्र असून या ठिकाणाला राज्य शासनाने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले असून जैन समाजाचा या निर्णयाला प्रचंड विरोध असून याचा निषेध करण्यासाठी उद्या बुधवार दिनांक 21 डिसेंबर रोजी करमाळा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा निघणार आहे या मोर्चाची निवेदन आज जैन समाजाच्या वतीने करमाळा तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले

निवेदनात म्हटले आहे की सम्मेद शिखर हे जैन धर्मियांसाठी पवित्र स्थान आहे याला पर्यटन स्थळ म्हणून मान्यता मिळाली तर या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य होऊन या पर्यटन स्थळाचा फायदा घेऊन मांसाहारी सुद्धा हॉटेल बार दारूचे दुकाने भविष्यात सुरू होणार आहेत यामुळे श्री सम्मेद शिखराचे पावित्र्य धोक्यात येण्याची भीती आहे

श्री सम्मेद शिखर यांच्या दर्शनासाठी संपूर्ण जगातून जैन धर्माचे भक्त येत असतात याला पर्यंत पर्यटन स्थळ जाहीर करा अशी कोणीही मागणी केलेली नाही मात्र तरीसुद्धा जाणीवपूर्वक या तीर्थस्थानाला पर्यटन स्थळ जाहीर करून जैन धर्मियांची भावना दुखण्याचे काम झारखंडमध्ये सुरू आहे याला विरोध करण्यासाठी करमाळा तालुक्यातील जैन बांधवांच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चाची सुरुवात जैन मंदिर करमाळा येथून होणार आहे व तहसील कचेरी येथे त्याचा समारोप होणार आहे

मोर्चाचे निवेदन देण्यासाठी जैन समाजातील नवीन मुथा जगदीश अग्रवाल जितेश कटारिया पिंटू शेठ बलदोटा यशराज दोशी अशीष दोशी पिंटू शेठ कटारिया सुदर्शन गांधी अरुण काका जगताप आधी जण उपस्थित होते
उद्या करमाळा शहर तालुक्यातील जैन धर्मियांची सर्व प्रकारचे दुकाने बंद राहणार आहेत करमाळा तालुक्यातील जेऊर केम कंदर पारेवाडी या भागातील सर्व जैन धर्म लोक आपली सर्व व्यावसायिक आस्थापने बंद ठेवून आपला निषेध व्यक्त करणार आहेत


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी