गुजरात राज्यातील जिल्हा सौराष्ट्र श्री शत्रुंजय तीर्थस्थळ संरक्षणार्थ यवत येथील जैन धर्मियांनी व्यापारी दुकान बंद, मूक मोर्चा काढुन केला निषेध व्यक्त
By : Polticalface Team ,22-12-2022
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता २१ डिसेंबर २०२२, गुजरात राज्यातील जिल्हा सौराष्ट्र येथील श्री शत्रुंजय तीर्थस्थळ जैन धर्मियांचे पवित्र तीर्थस्थळ संरक्षणार्थ सकल जैन समाज बांधवांनी व्यापारी दुकान बंदची हाक देऊन मुक मोर्चा काढून
यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना निवेदन देण्यात आले,
जैन समाजाचे पवित्र स्थळ श्री शत्रुंजय मंदिर या धार्मिक तीर्थस्थळावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध निवेदनाद्वारे दि,२० डिसेंबर रोजी निषेध करण्यात आला,
दौंड तालुक्यातील मौजे यवत येथील दिगंबर जैन मंदिर यवत अध्यक्ष रमेश लक्ष्मीचंद जैन, शेतांबर जैन मंदिर यवत अध्यक्ष राजेंद्र सोमतीलाल शहा, भारतीय जैन संघटना अध्यक्ष कश्मिराबेन रसिकलाल मेहता तसेच यवत पंचक्रोशीतील सकल जैन धर्मिय समाज बांधव व्यापारी दुकानदारांनी दुकान बंद हाक दिल्याने सहखुशिने दुकान बंद करून मुक मोर्चाला मोठ्या संख्येने पाठिंबा दिला, या प्रसंगी यवत येथील जैन धर्मियांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,
गुजरात राज्यातील जिल्हा सौराष्ट्र येथील श्री शत्रुंजय तीर्थस्थळ हे जैन धर्मियांचे पवित्र स्थळ मानले जाते, या ठिकाणी काही दिवसापासून असंवेदन शिल उपद्रवी असामाजिक तत्वांचे उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने, तसेच जैन धर्मियांचे पवित्र मंदिरात आणि परिसरात अंधा धुंदी दहशतीचे वातावरण निर्माण करुन मंदिरामध्ये तोडफोड करणे, तीर्थयात्रे करूंना साधू साधकांना विनाकारण दहशत व मानसिक त्रास देणे, असे उपद्रवाचे प्रकार सतत घडत आहेत, या संदर्भात केंद्र सरकार आणि गुजरात सरकार यांनी सौराष्ट्र येथील श्री शत्रुंजय मंदिर तीर्थस्थळ संरक्षणार्थ तत्काळ दखल घेऊन कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, केंद्र सरकार व राज्य सरकार यांना
जैन धर्मियांच्या भावनांचा दुखावल्या आहेत याची जाणीव करुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील यवत तालुका दौंड जिल्हा पुणे सकल जैन समाज बांधवांनी गुजरात राज्यातील जिल्हा सौराष्ट्र श्री शत्रुंजय तीर्थस्थळ धार्मिक जैन मंदिर येथील सतत होणाऱ्या दहशत व मंदिर परिसरात होत असलेल्या असंवेदनशील विकृती विरुद्ध तत्काळ दखल घेऊन कायदेशीर कार्यवाही करावी तसेच भविष्यात असे प्रकार घडू नयेत याची दखल घेऊन सौराष्ट्र सरकारने श्री शत्रुंजय तीर्थस्थळ या धार्मिक स्थळावर सरकारने दुर्लक्ष करु नये,
जागतिक पातळीवर जैन समाज हा शांतता प्रिय व अहिंसावादी धर्म आहे, परंतु ह्या असामाजिक तत्त्वामुळे व धार्मिक स्थळावर दहशत होत असल्याने जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र भूमीचे पावित्र्य संपुष्टात येत आहे, जैन धर्मीयांच्या अस्मितेवर घाला घालण्याचा हा खोडसाळ प्रयत्न आहे, त्यामुळे देशभरातील सकल जैन समाजामध्ये संतापाची लाट उसळली असून देशभरात सर्व स्तरातून सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात असल्याने यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील सकल जैन समाज तसेच धार्मिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील जैन धर्मीय बांधवांनी व व्यापारी दुकानदार यांनी आपली दुकाने बंद करून सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे, श्री शत्रुंजय तीर्थस्थळ मंदिर संरक्षणार्थ व जैन धार्मिक स्थळावर होत असलेल्या दहशत विकृती बाबत, जाहीर निषेधार्थ मोठ्या संख्येने मुक मोर्चात सहभाग घेऊन यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्याकडे, निवेदनाद्वारे निषेध नोंदवला आहे, या वेळी यवत ग्रामपंचायत उपसरपंच सुभाष यादव, युवा नेते गणेश शेळके, सकल जैन समाज बांधव तसेच व्यापारी दुकानदार भीषण जैन, रमेश जैन, विजय गुजर, राजेंद्र शहा, भुपेंद्र शहा, युवराज मेहता, काश्मीरा मेहता, सह महिला वर्ग, जितेंद्र शहा, राजेंद्र जैन, डॉ गांधी, यवत पंचक्रोशीतील सर्व जैन समाज व व्यापारी दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.