डी आर जे इंडस्ट्रीज व रुथ प्येअर मिनिस्ट्री आयोजित महिला रोजगार मेळावा संपन्न

By : Polticalface Team ,23-12-2022

डी आर जे इंडस्ट्रीज व रुथ प्येअर मिनिस्ट्री आयोजित महिला रोजगार मेळावा संपन्न तालुका प्रतिनिधी - आज प्रत्येक महिलांचे स्वतःच असं एक विश्व, स्वतःचं असं एक स्वप्न असतं आणि ते म्हणजे...स्वावलंबनाच! प्रत्येक महिलेला आपण कमावलेल्या पैशावर-कमाईवर अभिमान असतो. हाच अभिमान डी.आर.जे. इंडस्ट्रीज अहमदनगर व रुथ प्येअर मिनिस्ट्री शेवगाव,यांच्या संयुक्त विद्यमाने शेवगाव येथील B9 हाँटेलमध्ये महिला रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी रुथ प्लेअर मिनिस्ट्रीच्या मोनिका मगर यांनी महिलांना रोजगाराच्या संधी याविषयी माहिती देताना सांगितले की तुमची जागा फक्त किचन मध्ये नाही!तुम्हाला उत्तम गृहिणी सोबतच एक यशस्वी उद्योजिका होण्याची सुवर्णसंधी या नवीन वर्षात मिळाली तर तुम्ही कराल? ते ही अगदी तुमच्या किचन मधून सुद्धा घरबसल्या अनेक व्यवसाय करण्यासाठी आहेत यात मेनबत्ती तयार करणे,पत्रावळी द्रोन तयार करणे, प्लास्टिक पिशव्या तयार करणे,कागदी ग्लास बनवणे,वाती बनवणे,असे अनेक छोटे व्यवसाय आपण घरी बसून करू शकतो. तसेच डी.आर.जे इंडस्ट्रीज चे मालक दादासाहेब जावळे यांनी सांगितले की आम्ही आपणास करत असलेल्या व्यवसायातून नक्कीच तुम्ही तुमची स्वप्नं पूर्ण करू शकता. आजच आमच्याशी संपर्क साधा आणि आपल्या स्वप्नपूर्तिच्या दिशेने वाटचाल करा.आम्ही तुम्हाला देतोय घरबसल्या व्यवसाय करण्याची सुवर्णसंधी आपल्याला कोणतेही अर्थसाहाय्य मिळवून देण्यासाठी बँक लोन,कच्चा माल, पक्का माल विकणे, मार्केट उपलब्ध करून देणे,शाॅप अॅक्ट लाईसन्स काढणे, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे मिशनरी उपलब्ध करून देणे इ‌.बाबींची माहिती दिली.यावेळी उपस्थित मेळाव्यात अर्चना दादासाहेब जावळे, विक्रम मगर,जाॅन मगर,शुभम जावळे,मंगल मगर,प्राची महिला बचत गट, पवित्र महिला बचत गट, रागिणी महिला गट,सान्वी महिला गट,खुशी महिला गट, ज्ञानेश्वर महिला गट,माही महिला गट,सानिक महिला गट,रमाई महिला गट,संम्बोधी महिला गट,अवनी महिला गट,श्रद्धारोज महिला गट,इ महिला गटातील अध्यक्ष, महिला सदस्य, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह अनिल चोटूले यांनी मानले
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.