राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे निलंबन मागे घेण्यासाठी व सरकारच्या हुकूमशाही कृतीचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस श्रीगोंदाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

By : Polticalface Team ,23-12-2022

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे निलंबन मागे घेण्यासाठी व सरकारच्या हुकूमशाही कृतीचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस श्रीगोंदाच्या वतीने  तहसीलदार यांना निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मा.आमदार राहुल जगताप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष घनश्याम आण्णा शेलार यांच्या वतीने जयंतराव पाटील साहेबांचे निलंबन मागे घेण्याबाबतचे व राज्य सरकारच्या हुकूमशाही कृतीचा निषेध करण्यासाठीचे निवेदन तहसीलदार मिलिंद कुलथे साहेब यांना देण्यात आले. तसेच केलेले निलंबन तात्काळ मागे न घेतल्यास मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

निवेदनात म्हटले आहे की, गेले काही दिवसांपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनात विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न शिंदे - फडणवीस सरकार कडून होत आहे. जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नाची जसे की छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी, राज्यातील तरुणांना भेडसावणारा बेरोजगारीचा प्रश्न, महागाई, शेतकरी आत्महत्या आदी मुद्द्यांवर चर्चा होऊ नये, असा सरकारचा प्रयत्न आहे.

दिशाभूल करणारे विषय सभागृहात उपस्थित करून सभागृहाचा मौल्यवान वेळ सत्ताधारी पक्षातील आमदार वाया घालवत आहेत. विरोधकांना बोलण्याची संधीच दिली जात नव्हती, तसेच मुख्यमंत्र्यांनी केलेले बेकायदेशीर भूखंड वाटप व गैरव्यवहार प्रकरणी उपस्थित करत असलेली चर्चा टाळण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न होत होता, म्हणूनच जयंतराव पाटील यांनी सदनात उभे राहून "असा निर्लज्जपणा करू नका" असे शिंदे - फडणवीस सरकारला उद्देशून म्हणाले, मात्र विरोधकांचा आवाज दाबण्याचा व वचक बसविण्याच्या उद्देशाने सरकारने असे विधान अध्यक्षांना उद्देशून बोलल्याचा बनाव केला व जयंतराव पाटील यांना हे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम या सरकारने केले आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, ओ.बी.सी.सेल तालुकाध्यक्ष संजय आनंदकर, युवक तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, शहराध्यक्ष भाऊसाहेब खेतमाळीस, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अजिमभाई जकाते, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष संदीप उमाप, विद्यार्थी तालुकाध्यक्ष विजय खेतमाळीस, सेवादल तालुकाध्यक्ष शाम जरे, बाळासाहेब दुतारे, सुदामनाना नवले, भगवान गोरखे, नगरसेवक राजाभाऊ लोखंडे, संचालक आबा पाटील पवार, आबासाहेब शिंदे, मुकुंद सोनटक्के, दैवत जाधव, पांडू पोटे, विकास बोरुडे, तुळशीराम जगताप, मंगेश सूर्यवंशी, राजू पाटील मोटे, दादासाहेब औटी, शुभम खेडकर, धनंजय औटी, बालू मखरे, नामदेव सोनवणे, आण्णा नवले, जितेंद्र पाटोळे, सागर बोरुडे, भीमराव लकडे, गोरख घोडके, विकास वागस्कर, नामदेव सोनवणे, पप्पू कोथिंबीरे आदी उपस्थित होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी