By : Polticalface Team ,23-12-2022
त्याच प्रमाणे सिना कोळगाव प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये जमिनींचे संपादन न केल्यास लाभक्षेत्रातील प्रस्तावित शेतकर्यांच्या जमीनीवरील शेरे पुर्णपणे उठवण्याबाबत सरकारने धोरण ठरण्याची मागणी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केली त्यावेळी मंत्री शंभुराज देसाई यांनी पुनर्वसितांसंबधी सर्वकष धोरण ठरवुन त्यांच्या समस्यावर मार्ग काढनार असल्याचे सांगितले.
चर्चेवेळेस पंढरपूर तालुक्यातील उजनी प्रकल्पगस्त काही गावे पंढरपूर नगरपरिषदेच्या हद्दीत गेलेली आहेत त्यांना पुनर्वसन अंतर्गत मिळाल्या जाणार्या नागरी सुविधा अजून मिळालेल्या नाहीत तर मंगळवेढा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना जमिनींचे वाटप झालेले आहे पंरतु त्यांना गावठाण अद्याप ही मिळाले नसल्याचा मुद्दा आ.मोहिते-पाटील यानी सभागृहात उपस्थित केला यावर मंत्री देसाई यांनी संबंधित प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन आराखड्यात त्यांचे पुनर्वसन करण्याचे निश्चित आहे गावठाण देण्याचे निश्चित आहे संबंधित प्रकल्प पुनर्वसनाच्या आरखड्यात ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदीची लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल असे सांगितले.
करमाळा तालुका आणि परांडा तालुका लाभक्षेत्र असलेल्या सिना कोळेगाव प्रकल्पास १९९२ साली प्रसासकीय मान्यता देण्यात येऊन १९९४ साली या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरु झाले.२००७ साली या धरणाचे काम पुर्ण होऊन पाणी साठवण्यास सुरवात झाली.सिना कोळगाव प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ५.३१५ TMC इतकी असुन यामुळे करमाळा आणि परांडा तालुक्यातील १३४३५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येनार आहे.यात करमाळा तालुक्याच्या पुर्व भागातील सुमारे ४००० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणारआहे.
यासाठी करमाळा तालुक्यातील शेकडो शेतकर्यांनी आपल्या जमीनींचा प्रकल्पासाठी त्याग केला आहे. सिना कोळगाव प्रकल्पासाठीच्या एकुन ३१८१ हेक्टर बुडीत क्षेत्रापैकी करमाळा तालुक्यातील सुमारे १५०० हेक्टर एवढे क्षेत्र बुडीत झाले आहे.
सिंचनाच्या दृष्टीने काढण्यात आलेल्या कालव्यांची करमाळा तालुक्यातील एकुण लांबी २५.५० किमी एवढी असुन त्यासाठी करमाळा तालुक्याच्या पुर्व भागातील शेतकर्यांच्या जमिनी संपादित करण्यात आलेल्या आहेत. यासंदर्भात २०१२ साली विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांनी तत्कालीन पुनर्वसन मंत्री मा.पतंगराव कदम यांचे दालनात मिटींग लावली होती.त्यामध्ये सिना कोळगाव प्रकल्पग्रस्तांना खास बाब म्हणुन पर्यायी जमिनी देण्याच्या दृष्टीने दोन महिन्याच्या आत प्रस्ताव दाखल करुन कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते परंतु करमाळा तालुक्यातील कोळगाव,आवाटी निमगाव (ह), हिवरे,भालेवाडी मिरगव्हाण,गौंडरे या गावातील प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीनी अजुनही मिळाल्या नाहीत आणि मोबदला ही देण्यात आलेला नाही.अगोदर पुनर्वसन नंतर धरण हे सरकारचे धोरण असताना गेली २७ वर्षापासुन कोळगाव प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न प्रलंबित आहे लक्षवेधीच्या चर्चेवेळेस आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सविस्तर प्रश्न उपस्थित केले.
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष