राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

By : Polticalface Team ,23-12-2022

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नागपूर : सध्या नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. अधिवेशनामुळं सर्वच राजकीय पक्षांचे नेते नागपुरात आहेत. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर होते. त्यामुळं नागपुरात राज ठाकरे कोणाला भेटणार का? याबाबतची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु होती.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागपूर दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळात जाऊन भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. त्यांच्या या भेटीचे कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही. मात्र आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे.

राज ठाकरे यांनी आज नागपुरात मनसे कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केलं. तर राज ठाकरे आणि शिंदे यांच्या भेटीदरम्यान मनसे आमदार राजू पाटील हे देखील उपस्थित होते. तर या भेटीबाबत विधीमंडळातील कामकाजासह अन्य विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी भेटीचे फोटो ट्विट करत दिली आहे.

या भेटीबाबत मनसेनेही ट्विट करत माहिती दिली असून ट्विटमध्ये म्हटलं की, राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर आहेत. सध्या महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्याचंच औचित्य साधून राज ठाकरे यांनी नागपूर विधानसभेच्या मुख्यमंत्री यांच्या दालनात जाऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली, असं म्हटलं आहे.

दरम्यान, या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. तर येणाऱ्या काही दिवसांनी राज्यातील महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकामध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी