दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता,२२ डिसेंबर २०२२, दौंड तालुक्यातील मौजे डाळिंब ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादी आणि भाजपच्या सरपंच पदाच्या उमेदवारांना स्पष्ट नाकारले असुन काँग्रेस पक्षाचे अपक्ष उमेदवार मा. बजरंग मस्के यांना सरपंच पदी निवडून दिले असल्याने दौंड तालुक्यात अपक्ष उमेदवार व सरपंच मा. बजरंग मस्के यांचे कौतुक केले जात आहे.
दौंड विधानसभेलाही असाच चमत्कार करून दाखवावा दौंडच्या जनतेनेच प्रतिनिधी निवडावा अशी चर्चा गाव कारभारी आणि कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे,
राज्य शासनाने या ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतून सरपंच निवडीचा उपक्रम राबवल्याने गाव कारभारी व पॅनल प्रमुखांची डोकेदुखी ठरली होती, योग्य व सक्षम उमेदवार शोधणे मोठी कसरत झाली होती,
मौजे डाळिंब येथिल राजकीय दोन्ही गटाचे व सरपंच पदाचे तुल्यबल राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार अरुण म्हस्के आणि भाजपाचे उमेदवार नंदू म्हस्के, यांना मतदारांनी स्पस्टपणे नाकारून,
काँग्रेस पार्टीचे कट्टर कार्यकर्ते बजरंग म्हस्के यांना जनतेतुन सरपंच पदावर अधिक मतांनी निवडून दिल्याने तालुक्यातील विविध क्षेत्रातील नागरिकांच्या भोवया उंचावल्या आहेत
तालुक्यात बजरंग म्हस्के हे एकमेव काँग्रेसचे सरपंच म्हणून निवडून येण्याचा पराक्रम त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादी आणि भाजप पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना पक्षाचे मोठे पाठबळ व रसद होती, परंतु सर्व सामान्य कुटुंबातील काँग्रेस पक्षाचे कट्टर कार्यकर्ते बजरंग मस्के यांना मात्र पक्षाचे पाठबळ नसतानाही जनतेतून सरपंच पदाचा बहुमान म्हस्के यांनी मिळवून चमत्कार केला असल्याचे बोलले जात आहे,
दौंड तालुक्यात कुल विरोधात थोरात अशीच निवडणूक पाहायला मिळते
मात्र या डाळिंब ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये दोन्ही गटातील पॅनल प्रमुखांची व गाव कारभारी यांची दमछाक झाली असल्याचे दिसुन आले, वास्तविक पाहता डाळींब गावातील मतदारांनी सरपंच पदासाठी तिसरा पर्याय स्वीकारुन तालुक्याच्या राजकारणात परिवर्तन घडवून आणले असल्याचे बोलले जात आहे, तसेच
दौंड तालुक्याच्या राजकारणात
तिसरा पर्याय निर्माण होत नाही. या नागरिकांच्या चर्चेला पूर्णविराम देत न्याय मिळाला असल्याचेही बोलले जात आहे, डाळिंब येथील मतदारांनी अतिशय समंजस पणाने लोकशाहीचा अधिकार मताच्या रुपात बजवल्याचे संकेत दौंड तालुक्यातील जनतेला दिले आहेत, काही दिवसात येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत, त्यामुळे दौंड तालुक्यात डाळींब पॅटर्न गाजणार हे नाकारता येणार नाही.
मौजे डाळिंब येथील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अपक्ष उमेदवार बजरंग मस्के यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आघाडी मध्ये उमेदवारी मिळणे अपेक्षित होते, मात्र यांच्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे बोलले जात आहे,
तीस पस्तीस वर्षी नंतर दौंड तालुक्यातील काँग्रेस पक्षाला जनतेतून सरपंच निवडीचा बहुमान बजरंग मस्के यांनी मिळून तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधले आहे.
मी काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता आहे, डाळिंब मधिल मतदारांनी मला सरपंच पदावर निवडून दिले, माझे वडील स्वांतन्त्र्य् सैनिक आणि आझाद हिंद सेनेचे सैनिक होते तसेच स्व, सुदामा म्हस्के आणि स्व, मंत्री विठलरावं गाडगीळ यांची पुण्याई मानत असून मी काँग्रस सोडणार नाही अशी प्रतिक्रिया बजरंग म्हस्के ,सरपंच डाळिंब यांनी दिली आहे,
चौकट
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.