भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांची कार पुलावरून कोसळली,स्वतः जखमी असताना आमदार गोरेंनी केली सहकाऱ्यांची मदत

By : Polticalface Team ,24-12-2022

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांची  कार पुलावरून  कोसळली,स्वतः जखमी असताना आमदार गोरेंनी केली सहकाऱ्यांची मदत
सातारा :: भाजपचे साताऱ्यातील मान खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाला आहे. फलटणमध्ये त्यांची कार पुलावरून 50 फूट खाली कोसलळली त्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात आमदार जयकुमार गोरे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रूग्णालयाकडून देण्यात आली आहे.

जयकुमार गोरे यांच्यासह या गाडीमध्ये 4 आणखी लोक होते ते देखील गंभीर जखमी झाले आहेत. या गाडीमध्ये आमदार गोरे यांच्यासह स्वीय सहायक रुपेश साळुंखे, कार्यकर्ता कैलास दड्स आणि अंगरक्षक बनसोडे हे होते. तर यावेळी अपघात झाल्यानंतर आमदार गोरे यांनी आपल्या आणि सहकाऱ्यांच्या मदतीसाठी दाखवलेल्या समय सूचकतेचं मात्र कौतुक होत आहे.

अपघात झाल्यानंतर जखमी अवस्थेतच गोरेंनी वेळ न घालवता अपघाताची माहिती आणि परिस्थिती खासदार रणजितसिंह निंबाळकर, स्वीय सहायक अभिजित काळे आणि पोलिसांशी संपर्क करून दिली आणि मदत मागितली. यामुळे अपघातात जखमी झालेल्या आपल्या सहकाऱ्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पुणे-पंढरपुर रोडवर फलटणजवळ मालथनच्या स्मशानभूमीजवळ जयकुमार गोरेंची फॉर्च्यूनरएसयूव्ही कार पुलावरून 50 फूट खाली कोसलळली. प्राथमिक माहितीनुसार ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या अपघातात आमदार जयकुमार गोरे गंभीर जखमी झाले. तर त्यांच्यावर फलटणमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले. सध्या त्यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहे.

जयकुमार गोरे यांच्यासह या गाडीमध्ये 4 आणखी लोक होते ते देखील गंभीर जखमी झाले आहेत. तर इतर जखमींना बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाजपचे आमदार पुण्याहून दहिवडी या त्यांच्या गावी जात होते. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. पहाटेची वेळ असल्याने झोपेमुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि फॉर्च्युन ब्रिजची रेलिंग तोडून 50 फूट खाली पडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी