श्रीगोंदा तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनात नागरिकांनी मांडल्या विविध समस्यांच्या व्यथा

By : Polticalface Team ,24-12-2022

श्रीगोंदा तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनात नागरिकांनी मांडल्या विविध समस्यांच्या व्यथा लिंपणगाव (प्रतिनिधी)- २४ डिसेंबर रोजी संपूर्ण देशभर राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा येथील तहसील कार्यालयात नायक तहसीलदार डॉ. पंकज नेवसे व ग्राहक पंचायत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी तालुक्यातील विविध गावातून आलेल्या नागरिकांनी विविध प्रकारच्या समस्या व व्यथा या आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनात मांडून तहसीलदार व ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्यामध्ये प्रामुख्याने जनाजी पवार हंगेवाडी, गेनू भाऊ गुणवरे हिरडगाव, भाऊसाहेब ठवाळ हिरडगाव, नितीन शेळके, सुदाम कुटे आदींसह उपस्थित नागरिकांनी आपल्या अडचणी या राष्ट्रीय ग्राहक दिनात मांडल्या. परंतु ज्या समस्या व तक्रारी संबंधित विभागाशी होत्या ते अधिकारीच अनुपस्थित राहिल्याने नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी गंभीर दखल घेत जे संबंधित खात्याचे अधिकारी अनुपस्थितीत राहिले त्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावणार आहे. यावेळी ग्राहक पंचायतीचे प्रा विजय निंभोरे यांनी देखील विविध खात्याचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याबद्दल नाराजी व्यक्त करत अनुपस्थितीत अधिकाऱ्यांसंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रा निंभोरे यांनी यावेळी केल्या. नायब तहसीलदार श्री नेवसे यांनी ज्या नागरिकांच्या समस्या होत्या, त्यांची नावे व फोन नंबर घेऊन संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडे तात्काळ समन्वय साधून तात्काळ न्याय देण्याची भूमिका घेतली. याप्रसंगी ग्राहकपंचायतीचे प्रा विजय निंभोरे यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत मांडण्यात आलेल्या ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांचे विना विलंब तक्रारीचे निराकरण होण्याची अपेक्षा व्यक्त करत ग्राहक देखील जागृत झाला पाहिजे. त्यांनी हक्काने आपल्या अडचणी मांडाव्यात. निश्चितपणे योग्य न्याय देण्याची भूमिका घेतली जाईल. तसेच 15 मार्च रोजी साजरा होणारा जागतिक ग्राहक दिनाचा प्रसार होण्यासाठी तहसील व ग्राहकपंचायतीचे वतीने दोन दिवस अगोदर प्रभात फेरी काढण्याची सूचना केली. ती सर्वानुमते मान्य करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना नायब तहसीलदार डॉ पंकज नेवसे यावेळी म्हणाले की, प्रत्येक जण जन्मल्यानंतर देशाचा नागरिक होतो. तेव्हापासून ग्राहक देखील होतो. जागृतता विषयी मात्र अमंल होत नाही. त्यासाठी सर्वांनी आपल्या हक्काबाबत जागृत असले पाहिजे. त्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत असणाऱ्या ग्राहक पंचायत संघटनांचे पदाधिकारी ग्राहकांच्या हितासाठी असणाऱ्या संघटना यांच्याकडे तक्रारी करून आपल्या समस्यांचे निराकरण होणे गरजेचे आहे. असे सांगून ते पुढे म्हणाले की 15 मार्च च्या अगोदर यासंबंधी प्रभात फेरी काढून ग्राहकांना प्रबोधन करण्यात येईल असे सांगितले. यावेळी जेष्ठविधीतज्ञ अॅड रमेश जठार यांनी ग्राहक संरक्षण कायदा त्यातून अन्यायग्रस्त ग्राहकांना मिळणारा न्याय याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले. या राष्ट्रीय ग्राहक दिनास ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष शुभांगी पावशे, अॅड. रमेश जठार, पत्रकार नंदकुमार कुरुमकर, स्वस्त धान्य दुकानदार प्रतिनिधी गोवर्धन वागस्कर, दत्ताजी हिरनावळे, मल्हारी होले, श्रीमती सुनीता नेवसे, संतोष करंजुले, बबलू नागरगोजे, अक्षय शेंडगे, बाळासाहेब शिंदे, विनय कावळे, विकी ससाने, संदीप साळुंखे, सावता पाळेकर, परमेश्वर ठोकळे, परमेश्वर घोडके, पुरवठा निरीक्षक अविनाश निकम आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा विजय निंभोरे यांनी केले. आभार शुभांगी पावशे यांनी मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.