तर तो उपमुख्यमंत्रीही राहणार नाही, भाजपच्या माजी खासदाराकडून फडणवीसांचा एकेरी उल्लेख

By : Polticalface Team ,25-12-2022

तर तो उपमुख्यमंत्रीही राहणार नाही, भाजपच्या माजी खासदाराकडून फडणवीसांचा एकेरी उल्लेख सोलापूर : पंढरपूर कॅरिडॉरवरून स्थानिक राजकारण चांगलंच तापलं आहे. तरीदेखील त्यावर ठाम असलेल्या देवेंद्र फडणवीसांवर भाजप नेत्यांकडून टीका केली जात आहे. भाजपचे माजी खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख केला आहे.

पंढरपूर कॅरिडॉरवरून भाजपमध्येच राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय. देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला आहे की, कोणीही मध्ये आलं तरी तिरुपतीच्या धर्तीवर तीर्थक्षेत्र पंढरपुरचं कॉरिडॉर होणारच. फडणवीसांच्या या भूमिकेवर भाजपचे माजी खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी एकेरी उल्लेख करत म्हटलंय की, मी आव्हान देऊन सांगतो की, पंढरपूर कॅरिडॉर होणार नाही आणि तो जास्त बोलला तर उपमुख्यमंत्रीही राहणार नाही, असं म्हणत फडणवीसांना एक प्रकारे इशाराचं दिला आहे.

स्वामी यांनीही भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांप्रमाणं या कॉरिडॉरला विरोध करत या कॉरिडॉरऐवजी पंढरपूरमधील इतर कामांना आणि कनेक्टीव्हीटीला प्राधान्य देण्याची मागणी केली आहे. स्वामी सोलापूर दौऱ्यावर असताना एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली. तीर्थक्षेत्र पंढरपूरमधील कॉरिडॉरच्या मुद्द्यावरुन स्थानिक पातळीवरील राजकारण चांगलंच तापलंय. वाराणसी आणि तिरूपतीच्या धर्तीवर तीर्थक्षेत्र पंढरपूर कॉरिडॉर होण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 2030 कोटी 70 लाख रूपये खर्चाचा विकास आराखडा तयार केलाय. दुसरीकडं हा कॉरिडॉर रद्द व्हावा या मागणीसाठी पंढरपुरात सर्वपक्षीय आंदोलन सुरू आहे. हा कॉरिडॉर रद्द न झाल्यास स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा देखील दिलाय.

काही स्थानिक कॉरिडॉरच्या मुद्यावर पंढरपूर कर्नाटकला जोडण्याची आणि पुढच्या वर्षी आषाढी यात्रेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या महापूजेसाठी आमंत्रित करण्याचा इशारा देत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॉरिडॉरबाबत ठाम असून काहीही झालं तरी हा कॉरिडॉर होणारच, असं सांगत आहेत. फडणवीसांवर टीका करताना फडणवीसांची उपमुख्यमंत्रीपदाची खुर्चीही जाईल, असा इशारा भाजपचे माजी खासदार सुब्रह्मण्यम स्वामी देत आहेत. त्यामुळं भविष्यात पंढरपूर कॅरिडॉरचा मुद्दा पेटणार आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी