पुन्हा लोकडाऊन नको - अनिल घनवट
By : Polticalface Team ,25-12-2022
लिंपणगाव (प्रतिनिधी) - चीन सहित इतर काही देशांमध्ये कोविडच्या वाढत्या प्रदूर्भावाचा धसका घेत भारतात पुन्हा लोकडाऊन करण्याचे नियोजन सुरू असल्याचे दिसते. लोकडाऊनमुळे आरोग्याला व अर्थव्यवस्थेला फायदा होण्या ऐवजी नुकसानच जास्त होत असल्यामुळे सरकारने पुन्हा लॉक डाऊन घोषित करू नये. तसे केल्यास स्वतंत्र भारत पार्टी, लोकडाऊन न पाळण्याचे आंदोलन जाहीर करेल असा इशारा स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
कोरोना व्हायरसचा नवीन व्हरीयनंट जगभर झपाट्याने पसरतो आहे व मोठ्या संख्येने लोक मृत्युमुखी पडत आहेत असा खोटा प्रचार प्रसार माध्यमात जोर धरत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा मास्क वापरण्याची सक्ती आणि लोकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इंडियन मेडिकल असोसीएशन ने सावधानतेचा उपाय म्हणून, सार्वजनिक जागेत मास्क वापरण्याची सक्ती, सोशल डिस्टन्सिंग, सर्व प्रकारचे सार्वजनिक, राजकीय कार्यक्रम, लग्न, सार्वजनिक मेळावे घेण्याचे टाळावे आशा मारदर्शक सूचना राज्यांना दिला आहेत. अंतर राष्ट्रीय प्रवास टाळण्याचे व सर्व विमान प्रवाशांना लसीकरण सक्तीचे केले आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कोविड चाचणी व लक्षणे आढळल्यास विलगिकरणात ठेवण्याच्या सुचना, दि. २२ डिसेंम्बर रोजी दिल्या आहेत.
याची पुढील पातळी म्हणजे लोकडाऊन. मागील लोकडाऊन मध्ये देशाचे मोठे नुकसान झाले आहे. जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला, कामगारांना हजारो किलमिटर पायी चालत जावे लागले. व्यापार, कारखानदारी ठप्प झाली, अनेकजण कर्जत बुडाले. कोविड नियंत्रण यंत्रणेत मोठे भ्रष्टाचार झाल्याचे ही नंतर उघड झाले आहे. आता कुठे उद्योग व्यवसाय सुरळीत होऊ पाहत आहेत. अशात पुन्हा लोकडाऊन लावल्यास जनतेचे प्रचंड हाल व देशाच्या अर्थव्यवस्थेवर संकट येणार आहे.
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी ने केलेल्या अभ्यासात हे निष्पन्न झाले आहे की ज्या देशांमध्ये कडक लोकडाऊन पाळले गेले तेथे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. अर्थव्यस्थेवर अनिष्ट परिणाम झाले. लहान मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम झाले असे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. ज्या देशांनी लोकडाऊन पाळले नाही त्यातील स्वीडन मध्ये कोविड काळात मृत्युदर, लोकडाऊन करणाऱ्या देशांपेक्षा कमी आहे. कोविड महामारी, स्पॅनिश फ्लू पेक्षा ५० ते ५०० पटीने कमी आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
स्वतंत्र भारत पार्टीने पहिल्या पासूनच सक्तीच्या लोकडाऊनला विरोध केला आहे. सरकारने जर पुन्हा आशा निरुपयोगी, त्रासदायक व नुकसानकारक लोकडाऊनची घोषणा केली तर स्व. भा. पार्टी त्याला जाहीर विरोध करेल व स्वतःची काळजी घेत सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्याचे जनतेला आवाहन करणार आहे. पुन्हा लोकडाऊन न करण्या बाबतचे विंनतीपत्र आरोग्य मंत्रालयाला देण्यात येणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पार्टीचे अध्यक्ष , अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.