ती महिला दाऊद गँगशी संबंधित, प्रकरणाची एनआयएकडून चौकशी करा : राहुल शेवाळे

By : Polticalface Team ,25-12-2022

ती महिला दाऊद गँगशी संबंधित, प्रकरणाची एनआयएकडून चौकशी करा : राहुल शेवाळे मुंबई : आपल्यावर आरोप करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पैशांसाठी आपल्याला त्या महिलेनं ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं आहे. संबंधित महिलेचा पाकिस्तानी ग्रुप आहे. ही महिला दाऊद गँगशी संबंधित असल्याचंही शेवाळे यांनी सांगितलंय. हे प्रकरण साधसुधं नसून दाऊद गँगशी संबंधित आहे. त्यामुळं या प्रकरणाची एनआयएच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी खासदार शेवाळे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडं केली.

आपल्याच पक्षातील लोक त्या महिलेला संपर्क करुन आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप शेवाळेंनी केलाय. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्याला या प्रकरणी मदत केली असल्याचं शेवाळेंनी सांगितलं. त्या महिलेला कोरोनाच्या काळात मी मदत केल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

संबंधित महिला दुबईची आहे. पाकिस्तानी एजंटच्या मदतीने संबंधित महिलेनं फेक अकाऊंट चालवले होते. आपल्या पत्नीला वारंवार धमक्या आल्याचेही शेवाळे म्हणाले. ही महिला खोट्या तक्रारी करत असल्याची माहिती मी उद्धव ठाकरे यांना दिली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी याविषयी लक्ष देण्यास तत्कालीन मंत्री अनिल परब यांना सांगितलं. याप्रकरणी आपल्याला उद्धव ठाकरेंनी मदत केल्याचंही शेवाळेंनी सांगितलं.

पुढे त्या महिलेकडून आपल्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे शेवाळेंनी सांगितले. यावेळी या प्रकरणाची एनआयएकडून चौकशी करण्याची मागणी देखील यावेळी खासदार शेवाळेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

शिवसेना सोडल्यानंतर युवा सेनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्याबद्दल चुकीची माहिती पसरवल्याचंही त्यांनी सांगितलं. युवासेना प्रमुखांमुळेच या गोष्टी घडल्याचे सांगत शेवाळेंनी आदित्य ठाकरेंवर टीका केल्याचं दिसून येतंय. या महिलेला युवा सेनेचे पदाधिकारी फॉलो करत असल्याचेही शेवाळे म्हणाले

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी