हिंदू तुमच्या विरोधात नक्कीच हिंदू एकता दाखवणार, राम सातपुतेंचा प्राजक्त तनपुरेंना इशारा

By : Polticalface Team ,25-12-2022

हिंदू तुमच्या विरोधात नक्कीच हिंदू एकता दाखवणार, राम सातपुतेंचा प्राजक्त तनपुरेंना इशारा तनपुरेंनी मटक्यावाले, वाळुमाफीया आणि ख्रिश्चन मिशनरींचे हस्तक घेऊन काढलेला मोर्चा जनक्षोभ कसा? थोड थांबा तनपुरे २०२४ ला राहुरी मतदारसंघातला हिंदू तुमच्या विरोधात नक्कीच हिंदू एकता दाखवणार असल्याचा इशारा भाजपचे आमदार राम सातपुते यांनी दिलाय.

अहमदनगरमधील ब्राम्हणी धर्मांतरण प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांची बदली करण्यात आली. धर्मांतर प्रकरणात लक्ष दिलं नसल्याचा आरोप ठेऊन त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

दराडे यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईविरोधात राहुरीचे राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मोर्चा काढून दराडे यांना पाठिंबा दर्शवला होता. दराडे यांनी अनेक गुन्ह्यांचे तपासही अल्पावधीत पूर्ण केले होते. असे असतानाही कथित प्रकरणांवरून कोणतीही चौकशी न करता शासनाने त्यांची बदली केली.

हे योग्य नाही. या बदलीच्या निषेधार्थ राहुरी येथे रस्ता रोको आंदोलनात हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले, असं ट्विट आमदार तनपुरेंनी केलं. विशेषतः महिलांनी त्यांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले आहे. तरूण मुलींच्या छेडछाडीचे प्रकार कमी करण्यासाठी त्यांनी प्रभावी मोहिम राबवलेली असल्याचंही त्यांनी म्हंटलंय.

दरम्यान, एकंदरीत या संपूर्ण प्रकरणानंतर आता तनपुरे मटक्यावाले, वाळुमाफीया आणि ख्रिश्चन मिशनरींचे हस्तक घेऊन काढलेला मोर्चा जनक्षोभ कसा? थोड थांबा तनपुरे २०२४ ला राहुरी मतदारसंघातला हिंदू तुमच्या विरोधात नक्कीच हिंदू एकता दाखवेल. असल्या भाड्याने आणलेल्या गर्दीला हे सरकार भीक घालणार नाही. तनपुरे = हिंदूविरोधी, असं ट्विट भाजपचे आमदार राम सातपुते यांनी केलंय.

राहुरीकर एका चांगल्या अधिकाऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. या जनक्षोभाची शासनाने दखल घेऊन प्रताप दराडे यांची करण्यात आलेली बदली रद्द करावी, अशी मागणी प्राजक्त तनपुरे यांनी केलीय

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी