लोककल्याण आधार मंच महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे दिपक म्हस्के आणि ज्योती मोकळ समाजभूषण गुण गौरव पुरस्काराने सन्मानित....
By : Polticalface Team ,26-12-2022
दौंड: लोककल्याण आधार मंच महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे समाजाच्या हितासाठी सामजिक बांधिलकीची जाण ठेवून निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव व्हावा यासाठी समाजभूषण गुण गौरव देण्यात येतो. सन २०२२ साठीचा समाजभूषण गुण गौरव पुरस्कार श्री. दीपक म्हस्के,सहाय्यक प्रकल्प अधिकारी, दौंड नगर परिषद आणि ज्योती मोकळ, अध्यक्ष जनकल्याण वस्तीस्तर संघ, दौंड यांना संजय पाटील तहसीलदार , अजिंक्य येळे गटविकास अधिकारी दौंड आणि लोककल्याण आधार मंच महाराष्ट्र राज्यचे पदाधिकारी प्रमोद शितोळे आणि तालुका अध्यक्ष नामदेवराव जठार-पाटील यांच्या उपस्थितीत आज दि. २६/१२/२०२२ रोजी नवीन प्रशासकीय इमारत, दौंड येथे देण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रमोद शितोळे यांनी दीपक म्हस्के यांच्या दौंड शहरातील बचत गट,दिव्यांग जन आणि पथविक्रेता यांच्यासाठी निस्वार्थ भावनेने केलेल्या कामाचा आवर्जून उल्लेख केला आणि भविष्यातील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
वाचक क्रमांक :