..म्हणून तृतीयपंथीयांनी पेटत्या चितेसमोर मांडली अघोरी पूजा

By : Polticalface Team ,26-12-2022

..म्हणून तृतीयपंथीयांनी पेटत्या चितेसमोर मांडली अघोरी पूजा पुणे : गेल्या काही दिवसांपासून अंधश्रध्देचे अनेक प्रकार देशासह राज्यातील काही भागांत याआधी समोर आलेले आहेत. याविरोधात अनेकांनी प्रयत्न करुन असे प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न केले आहेत. यासंदर्भात अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने अनेकदा नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे. अंधश्रध्देविरोधात जनजागृती करण्यासाठी प्रगतशील समाज कायम अग्रेसर राहीला आहे. अशातच पुरोगामी महाराष्ट्रात एका पेटत्या चिते समोर दोन तृतीयपंथीयांना अघोरी पूजा करताना पोलिसांना त्यांनी रंगेहाथ पकडले होते. ही घटना नूकतीच असून ही पूजा का आणि कशासाठी करत असल्याचं अखेर या आरोपींनी पोलिसांना सांगितलंय.

स्मशानभूमीत अघोरी पूजा केल्याने धन मिळतं, चांगलं होतं, वेगैरे असा समज काही तांत्रिक-मात्रिकांकडून समाजात पसरवला जातो. याला बळी पडून सर्वसामान्य नागरिक त्यांच्या सांगण्याला बळी पडल्याच्या काही नवीन नाहीत. आता या घटनेत स्वत; तृतीयपंथीयच आपल्या स्वार्थासाठी पेटत्या चितेसमोर रात्री अपरात्री अघोरी पूजा करत असल्याचं समोर आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.

ही घटना महाराष्ट्राचं सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जाणाऱ्या पुण्यात घडल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील उच्चभ्रू भागातील वैकुंठ स्मशानभूमीत एका रात्री दोन तृतीयपंथीयांकडून पेटत्या चितेसमोर अघोरी पूजा करण्यात आली होती. या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्यांनी रंगेहाथ ताब्यात घेत दोन तृतीयपंथीयांना अटक केली.

लक्ष्मी निबाजी शिंदे आणि मनोज अशोक धुमाळ अशी या दोन तृतीयपंथीयांची नावं असून त्यांना अटक केल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबूली दिलीय. अटक करण्यात आलेल्या दोन तृतीयपंथीयांपैकी एकाच्या आईला कॅन्सर आजार जडलेला होता. रात्री अपरात्री स्मशानभूमीत पेटत्या चितेसमोर अघोरी पूजा केल्यास आईचा कॅन्सर आजार बरा होईल, या समजातून त्या दोघांनी त्या रात्री वैकुंठ स्मशानभूमीतील पेटत्या चितेसमोर ठरल्याप्रमाणे अघोरी पूजा मांडण्याचा बेत आखला.

त्यानूसार या दोघांनीही तशी तयारी केली. आणि ठरललेल्या दिवशी, त्या वेळेत दोघांनी स्मशानभूमी गाठली. सोबत असलेल्या आपल्याला पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची मांडणी करुन त्यांनी आपल्या अघोरी कृत्याला सुरुवात केलीय. ही अघोरी पूजा मध्यान्हपर्यंत आली होती. अखेर त्याचवेळी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि दोघा तृतीयपंथीयांच्या अघोरी पूजेचं भांड फुटलं, अशी कबुली या दोघा तृतीयपंथीयांनी पोलिसांना दिलीय.

दरम्यान, पुण्यासारख्या शहरात अशी घटना घडल्याने राज्यभरात हा विषय चर्चेचा बनला असून अंधश्रद्धेला आजही बळी पडणाऱ्यांची संख्या दिसून येत असल्याचे वास्तव या घटनेतून समोर आले आहे. या घटनेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून अशा समजांवर विश्वास ठेऊ नका, असं सातत्याने अंधश्रध्दा निर्मूलन समितीकडून राज्यातील जनतेला आवाहन करण्यात येतंय

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष