कर्जत एमआयडीसीत कंपन्या कधी येणार? रोहित पवारांनी वेधले विधानसभेत लक्ष

By : Polticalface Team ,26-12-2022

कर्जत एमआयडीसीत कंपन्या कधी येणार? रोहित पवारांनी वेधले विधानसभेत लक्ष अहमदनगर : नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत एमआयडीसीत कंपन्या कधी येणार, असा प्रश्न विचारत राज्य सरकारचे लक्ष वेधले.

लक्षवेधी काळात रोहित पवार यांनी राज्याच्या उद्योग मंत्री उदय सामंत यांना प्रश्न विचारला. ते म्हणाले, उदय सामंत हे युवा मंत्री आहेत. त्यामुळे राज्यातील युवकांच्या आशा त्यांच्याशी जोडलेल्या आहेत. माझ्या मतदार संघातील युवकही त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत.

माझ्या निवडणुकीच्या वेळी मी कर्जत-जामखेडच्या युवकांना रोजगार मिळवून देण्याचा शब्द दिला होता. कर्जत-जामखेडमध्ये क्षमता आहे मात्र संधी मिळाली नाही. येथील युवक नोकरी निमित्त मोठ्या शहरांत जात आहेत. महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मंत्री सुभाष देसाई व आदिती तटकरे यांच्याकडे मी कर्जतमध्ये एमआयडीसी होण्यासाठी पाठपुरावा केला.

१८ नोव्हेंबर २०२१ला कर्जतमधील एमआयडीसीसाठी स्थळ पाहणी करण्यात आली होती. मंत्री सामंत यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक होणार असल्याचे सांगितले आहे. त्या कंपन्यांना कर्जतमधील एमआयडीसी दाखविण्यात आली आहे का? अहमदनगर जिल्ह्यातील नगर शहर, सुपा येथील एमआयडीसीतील भूखंड संपले आहेत.

कर्जत एमआयडीसी दोन्ही एमआयडीसींना जवळ आहे. या एमआयडीसीसाठी राष्ट्रीय महामार्ग होणे आवश्यक होते त्यासाठी मी व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे रस्ते झाले. वीज आहे. एमआयडीसी मान्य केली आहे.त्यामुळे कर्जत एमआयडीसीत कंपन्या केव्हा येणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

यावर उदय सामंत यांनी सांगितले की, कायद्यानुसार या एमआयडीसीत कंपन्यांना मान्यता देऊ. शासनाला मध्यस्थी करून कंपन्या द्याव्या लागल्या तरी देऊ. कायदेशीर प्रक्रिया २०२३मध्ये पूर्ण करू. संबंधित कागदपत्रांवर अधिवेशन संपण्यापूर्वी सह्या होतील, असे सकारात्मक उत्तर दिले

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी