न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित करा - उद्धव ठाकरे

By : Polticalface Team ,26-12-2022

न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित करा - उद्धव ठाकरे नागपूर : आज आपले मुख्यमंत्री दिल्लीत गेले पण महाराष्ट्राचा विषय सोडून मुख्यमंत्र्यांना दिले जाण्याची गरज नव्हती. दिल्लीत ते महाराष्ट्राच्या सीमा वादावर बोलणार आहेत का ? गृहमंत्र्यांसोबत चर्चा झाली. दोन्ही मुख्यमंत्री एकत्र आले. मात्र सर्वोच्च न्यायालयात हा खटला जोपर्यंत दाखल आहे, प्रलंबित आहे. तोपर्यंत परिस्थिती जैसे ठेवायची भूमिका आपल्या सरकारची आहे. मात्र कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर कर्नाटकने एक एक पाऊल पुढे टाकले आहे. पण आपल्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडातून ब्र का नाही? असा सावाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. आज नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशनात उद्धव ठाकरे हे विधान परिषदेत बोलले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आपली भूमिका मांडली.

आज महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर जो ठराव मांडणार आहे. तो ठराव कसा असणार आहे ? माझं मत आहे. हा ठराव असायला हवा की, जोपर्यंत हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तोपर्यंत कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश झाला पाहिजे. अशी मागणी केली पाहिजे. दरवेळेला अत्याचार होतात. मात्र आम्ही काय करतो ? फक्त बसला काळ फासतो तिकडे मात्र आपल्या मराठी बांधवांना फरफटत नेले जाते. महाराष्ट्रातील काही ग्रामपंचायतीने कर्नाटकमध्ये जाण्याचा ठराव करतात. आपण त्यांच्यावरती काय कारवाई केली जातेय ? मात्र कर्नाटकने असा ठराव करणाऱ्या महापालिकेला बरखास्त केलं होतं. त्याचबरोबर आज अशा प्रकारच्या ग्रामपंचायतीवर देखील निर्णय झाला पाहिजे. अशी भूमिकाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी मांडली.

येथील लोकांनी विविध मार्गाने महाराष्ट्रामध्ये राहण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. यामध्ये निवडणुका, आंदोलन, ठराव यांचा समावेश आहे. मी आपल्याला एक पेन ड्राईव्ह देणार आहे. कारण विरोधी पक्षात आल्यानंतर पेन ड्राईव्ह यायला लागतात. या पेन ड्राईव्हमध्ये महाराष्ट्र सरकारने त्याकाळी केलेले एक फिल्म आहे. केस फॉर जस्टिस यामध्ये साधारण अठराव्या शतकापासून बेळगावच्या भागात मराठी भाषा कशी वापरली जात आहे. याचे सर्व पुरावे आहेत. दोन्ही सभागृहात ही फिल्म दाखवण्यात यावी. त्यामुळे आताच्या सर्व सदस्यांना कळेल की, हा ठरव नेमका काय आहे ? या विषयावरती पूर्वी महाजन रिपोर्ट आला होता. देशाचे सरन्यायाधीश होते महाजन. त्या रिपोर्टचे चिरफाड करणारे पुस्तक महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांनी लिहिलेला हे पुस्तक देखील सदस सदस्यांना देण्यात यावं असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष