हेच संघाचे संस्कार का? सामनातून देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल

By : Polticalface Team ,26-12-2022

हेच संघाचे संस्कार का? सामनातून देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊतांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केलीय. खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय की, नागपुरात तब्बल 110 कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा झाला तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचार करणाऱ्यांना क्लीनचिट देत फिरताहेत. भाजपचे लोक सत्यवचनी रामाचं नाव घेत भूखंडाचे श्रीखंड खाणाऱ्यांचं भजन गात आहेत. हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार म्हणायचे का?, असा खोचक सवाल संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारलाय.

नागपूरमधील भूखंड घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी नेमली असती तर त्यांचं चरित्र आणखी उजळून निघालं असतं, असं म्हणत संजय राऊतांची फडणवीसांवर जोरदार टीका केलीय. हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरमध्ये गेलेल्या बोक्यांच्या खोके सरकारचे मेंदू तेथील थंडीनं गारठले आहे. अधिवेशनात चिखलफेक करून सरकारनं महापुरुषांच्या अपमानाचा विषय मागं ढकलला आहे.

शिवरायांच्या अपमानावर दुसऱ्याच विषयांनी कुरघोडी करणाऱ्या सरकारच्या पेंढाऱ्यांचेच राज्य आले म्हटल्यावर दुसरे काय व्हायचे? असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटावर शाब्दीक हल्ला केलाय. शिवसेनेतून बंड करण्यासाठी शिंदे गटानं खोके घेतल्याचं आमदार महेश शिंदे सांगताना त्याची एसआयटी चौकशी का केली जात नाही? असा प्रश्न संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिल्यानंतर आता शिवसेना शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक झाल्याची पाहायला मिळतेय. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आदित्य ठाकरेंची बाजू लढवण्यासाठी खासदार संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं एक टीम नागपूरमध्ये पाठवलीय. त्यामुळं आता शिवसेना आणि भाजपमध्ये नागपुरात जोरदार राजकीय खडाजंगी पाहायला मिळू शकते

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.