By : Polticalface Team ,27-12-2022
आज डिसेंबर महिन्याचा वायदा टेंडर पीरियड मध्ये म्हणजे समाप्त झाल्यासारखेच आहे. जानेवारी कॉन्ट्रॅक्ट नसल्यामुळे बाजाराला किंमतीचा सिग्नल बंद झाला. याचा फायदा घेऊन हजर बाजार १००० रुपये क्विंटल एवढा मोठ्या प्रमाणात पाडला गेला. शेतकरी घाबरून माल विकू लागले. तर नंदुरबार मध्ये शेतकरी, व्यापाऱ्यांच्या निषेधासाठी रस्त्यावर आले असल्याचे समजते. वायदे बंदी वाढवल्यावर लगेचच शेतकऱ्यांचे शोषण सुरू झाले.
कापसाच्या दरात होणाऱ्या पडझडिस सेबीच जवाबदार आहे म्हणून कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाचे वायदे सुरू करण्याची मागणी करायला हवी व २३ डिसेंम्बर रोजी, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथिल से सेबीच्या कार्यालया समोर होणाऱ्या स्वतंत्र भारत पार्टीच्या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. अनिल घनवट राष्ट्रीय अध्यक्ष, स्वतंत्र भारत पार्टी. वाचक क्रमांक :