नागपुर हिवाळी अधिवेशनात चालकांचा आक्रोश मोर्चा, एस टी महामंडळाने रिक्त जागा भरती प्रक्रिया सुरू करावी, व कंत्राटी चालकांना पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी

By : Polticalface Team ,29-12-2022

नागपुर हिवाळी अधिवेशनात चालकांचा आक्रोश मोर्चा, एस टी महामंडळाने रिक्त जागा भरती प्रक्रिया सुरू करावी, व कंत्राटी चालकांना पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, नागपुर ता २८ डिसेंबर २०२२, रोजी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने शिवसेवक समिती महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला, या वेळी राज्यातील कंत्राटी चालकांनी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव जी शिंदे, मा उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, मा ना शंभुराज देसाई उत्पादन शुल्क परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिले आहे.

शिवसेवक समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, दि २८ डिसेंबर रोजी नागपुर येथील यशवंतराव चव्हाण स्टेडियम ते झिरो माईल दरम्यान हजारोंच्या संख्येने कंत्राटी चालक यांनी सहभाग नोंदवुन निवेदनाद्वारे आक्रोश मोर्चा व निदर्शने करून मतलबी एसटी महामंडळाला जागी करण्याचा प्रयत्न केला.

शिवसेवक समिती महाराष्ट्र राज्य संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू असताना निवेदनाद्वारे कंत्राटी चालक यांना, राज्य परिवहन महामंडळाने कठिन परिस्थितीमध्ये आवश्यक काळात कंत्राटी चालकांना संधी देऊन एस टी महामंडळाने एस टी चालु केली होती, त्यावेळी कंत्राटी कामगारांनी कोणत्याही परिस्थितीची तमा न बाळगता राज्य परिवहन महामंडळाला दिलासा दिला होता, राज्यातील वाहन चालकांनी जिवावर बेतुन एस टी संपामध्ये कंत्राटी चालकांनी शासनाला मदत केली होती, मात्र राज्य परिवहन महामंडळाने याकडे आता दुर्लक्ष केले आहे, पुर्वी गावाकडील म्हणी प्रमाणे हे परिवाहन महामंडळाने कृती केली असल्याचा स्पष्ट आरोप वाहन चालकांकडून केला जात आहे, (गरज सरो आणि वैद्य मरो) हि भुमीका एस टी महामंडळाने घेतल्याने राज्यातील हजारो चालक बेरोजगार होऊन कामाच्या प्रतीक्षेत आहेत.

कोरोना नंतर संप काळात एस टी महामंडळाने कंत्राटी चालकांना अनेक आश्वासने दिली होती, याचा शासनाला विसर पडला आहे की काय अशी प्रतिक्रिया शिवसेवक समिती महाराष्ट्र राज्य संघटनेचे संपादक आबासाहेब पाटील व युवक अध्यक्ष रविकुमार राजाभाऊ गायकवाड, यांनी झिरो माईल या ठिकाणी आंदोलन करत्यांना संवाद साधुन निदर्शने व मोर्चा काढुन निषेध व्यक्त केला,

तसेच एस टी महामंडळाने कंत्राटी चालकांना कामावरुन घरी पाठवले आहे, एस टी महामंडळाने उर्वरित सात हजार रिक्त जागांची भरती तत्काळ सुरू करावी, तसेच चालकांची भरती प्रक्रिया सुरू करावी, किंवा कंत्राटी चालकांना पुन्हा एसटी चालक म्हणून नोकरी ची संधी द्यावी, अशी मागणी या हिवाळी अधिवेशनात यशवंतराव चव्हाण स्टेडियम ते झिरो माईल येथे करण्यात आले, या कंत्राटी चालकांना कामावरुन घरी बसवल्याने त्यांच्या कुटुंबियांची उपासमारी व विविध संकटातून सुटका होऊ शकते, गेली तीन महिन्यांपासून कंत्राटी चालक या संदर्भात पाठपुरावा करत आहेत मात्र याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांनी सांगितले, या वेळी शिवसेवक समिती महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष आबासाहेब पाटील, युवक अध्यक्ष रविकुमार राजाभाऊ गायकवाड, गिरीश हुजरे,( कोल्हापूर) सैय्यद सोहील,( बुलढाणा) किशोर राठोड, (यवतमाळ) अमोल पांडुरंग खोकले, (चंद्रपूर) आप्पा पवार, आदी गरजु वाहन चालक मोठ्या संख्येने या आक्रोश महामोर्चा सहभागी झाले होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष