चिबडजमिनी निर्मूलन कार्यक्रमासाठी १० टक्के लोकवर्गणीची अट रद्द करून, लवकरच धोरण आणणार,आमदार राहुल कुल.

By : Polticalface Team ,29-12-2022

चिबडजमिनी  निर्मूलन कार्यक्रमासाठी १० टक्के लोकवर्गणीची अट रद्द करून, लवकरच धोरण आणणार,आमदार राहुल कुल.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता २८ डिसेंबर २०२२, महाराष्ट्र राज्यातील चिबड जमिन निर्मुलन करण्यासाठी १० टक्के लोकवर्गणीची अट रद्द करुन, लवकरच धोरण आणणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले, असल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी दिली, यावेळी बोलतना आमदार कुल म्हणाले कि, पुणे परिसरातील शेती व शेतकऱ्यांशी निगडित विविध विषय आमदार राहुल कुल यांनी लक्षवेधीद्वारे विधानसभेमध्ये उपस्थित केले त्यामध्ये खडकवासला धरण साखळीतून पुणे महानगर पालिकेद्वारे मंजूर ११.५ टिमसी कोट्याहुन अधिक पाणी वापर होत असल्याने सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यावर मर्यादा येत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची खंत कुल यांनी व्यक्त केली, हि बाब विचारात घेता पुणे महानगर पालिकेद्वारे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी होई पर्यंत शेतीच्या सिंचनासाठी काही अत्यावश्यक उपायोजना तातडीने मार्गी लावण्यात याव्यात अशी मागणी कुल यांनी केली.

खडक वासला धरण ते फुरसुंगी दरम्यान बोगद्यामधून पाणी नेण्याचा प्रकल्प तातडीने हाती घेण्यात यावा, जुना मुठा उजवा (बेबी कॅनॉल ), नवीन मुठा उजवा कालव्याची विस्तार, सुधारणा व अस्तरीकरणाच्या प्रस्तावित कामांना तातडीने मान्यता देऊन हि सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत, जनाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी सुधारित प्रस्तावास मान्यता देण्यात यावी, तसेच जलसिंचनामुळे चिबड, पाणथळ व क्षारयुक्त जमिनींचे प्रमाण वाढले असून चिबाड जमीन निर्मूलन करण्यासाठी १० टक्के लोकवर्गणीची अट रद्द करावी अशी मागणी विधानसभेमध्ये त्यांनी केली. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, खडकवासला धरणाची कामे प्रस्तावित आहेत. या कॅनॉल सिस्टीममध्ये खडकवासला व वरसगांव बाबत १३ कोटीच्या योजनेला मान्यता दिली आहे. याबाबत येत्या काळात ही कामे तत्काळ घेणार असून पुढील तीन महिन्यात कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. दहा टक्के लोकवर्गणी बाबत शासन गांभीर्याने विचार करेल, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये सिंचन पाणी वापरामुळे होणाऱ्या चिबड, खारवट व पाणथळ जमिनी निर्मूलन करण्याच्या अनुषंगाने दरवर्षी नियतकालीक निरीक्षणे घेण्यात येतात व त्या अनुषंगाने खराबा क्षेत्र निश्चित करण्यात येते. व हे खराबा क्षेत्र कमी करण्यासाठी चर योजनांची बांधकामे करण्यात येतात. शासनाने चिबड निर्मूलन कार्यक्रम हाती घेतला आहे. यासाठी निधी उपलब्ध करून दिला असून याबाबत नवीन धोरण आणणार आहोत. आवश्यकता भासल्यास यामध्ये जिल्हा नियोजन समितीचा समावेश करू अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

खडक वासला प्रकल्पांतर्गत सिंचन क्षेत्राची पुर्नस्थापना करण्यासाठी नवीन मुठा उजवा कालवा कि.मी. १ ते ३४ ला पर्यायी खडकवासला धरण ते फुरसुंगी बोगदा प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल विस्तार व सुधारणा कार्यक्रमांतर्गत तयार करण्यास शासन पत्र दि. १६/०२/२०२१ अन्वये शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली आहे. तसेच खडकवासला फुरसुंगी बोगद्याच्या सर्वेक्षण व सविस्तर भूतात्रिक अभ्यास करण्यासाठी आवश्यक खर्चाची तरतूद महामंडळाच्या निधीतून करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. खडकवासला धरण ते फुरसुंगी बोगद्याच्या प्राथमिक अन्वेषण अहवालास प्रदेश कार्यालयाने पत्र दि. ०८/०७/२०२१ रोजी मान्यता प्रदान केली आहे. नवीन व जुना मुठा उजव्या कालव्याच्या अस्तरीकरण / दुरुस्तीची काही कामे सुरु असून काही कामे विशेष दुरुस्ती, सिंचन पुनर्स्थापना निधी व बिगर सिंचन पाणीपट्टीतून हाती घेण्यात आलेली आहेत, तसेच उर्वरित कालवा दुरुस्ती कामांची अंदाजपत्रके तयार करण्याची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर प्रगतीत आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

कोहलेर पावर इंडिया कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी (शुगर) ५० कॉम्प्युटर, लॅपटॉप, वॉटर कुलर व मोठे झेरॉक्स मशीन भेट.

स्वर्गीय आमदार सुभाष आण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहे. आमदार राहुल कुल.

एनडीए सरकारच्या वाचाळवीरांवर तात्काळ गुन्हे दाखल करा:- युवक काँग्रेस

सहकार महर्षी बापूंनी सहकाराच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम केला - प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी सोलापुरात! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा; 40,000 महिलांना कार्यक्रमासाठी आणायला 400 बसगाड्या

स्वामी चिंचोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

शरद पवारही माझ्याकडे बघून हसू लागले; अशोक सराफांनी सांगितला सुप्रिया सुळेंच्या लग्नातला विनोदी किस्सा

स्वर्गीय सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या वांगदरी येथील अंबिका मातेचे मंदिरात व्याख्यान        

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राज्य निरीक्षक पदी भानुदास वाबळे यांची नियुक्ती

यवत येथील गणेश विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्ते झिंग झिंगाट. मंडळांच्या प्रमुखांनमुळं विसर्जन पार. पोलीस प्रशासनाचे नियम धाब्यावर. मागच्या दाराने दारु विक्री

गिरीम गावच्या सरपंचपदी संगिता किसन मदने (पाटील)यांची बिनविरोध निवड

पो. कॉ.ज्ञानेश्वर मोरेच्या रुपात खाकीतला एक कोहिनूर हरपला

अजितदादांनी या मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद

इंदापूरमध्ये शरद पवारांकडून उमेदवारीसाठी आप्पासाहेब जगदाळे यांच्या समर्थकांच्या हालचाली.! संकटसमई धावून आलेल्या आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी मिळणार..?

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात पहा तारीख आणि वेळ

अरविंद केजरीवाल देणार राजीनामा, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण होणार विराजमान

पितृसेवा म्हणजेच भगवंताची उत्तम सेवा होय -सोमनाथ महाराज बारगळ

श्री व्यंकनाथ विद्यालयात शिक्षक- पालक मेळावा उत्साहात संपन्न