By : Polticalface Team ,30-12-2022
प्रकाशना प्रसंगी पुढे, बोलताना शिर्के म्हणाले की, ऐतिहासिक राजे शिर्के घराण्याची प्राचीन राजधानी असलेल्या शृंगारपुरात महाराणी येसूबाईंचा जन्म झाला, बालपण गेले , जिथे त्यांनी छत्रपती शिव-शंभुराजांनी घडवलेले स्वराज्य सांभाळण्याचे योग्य संस्कार, शिक्षण घेतले. त्या पवित्र शौर्यभूमीत महाराणी येसूबाईंसह पिता श्रीमंत पिलाजीराजे शिर्के व शूरवीर बंधूंराजांची स्मारकं झालीच पाहिजे, ती निर्माण करण्यासाठी मी स्वतः समस्त शृंगारपूर करांसोबत असल्याचे स्पष्ट मत शभुसेना प्रमुख दिपकराजे शिर्के व्यक्त केले.
सह्याद्री कोकण अर्थात शिरकाण प्रदेशात मौजे शृंगारपूर, तालुका - संगमेश्वर, जिल्हा - रत्नागिरी हे गाव छत्रपती संभाजी महाराजांची सासरवाडी असून राजे शिर्के घराण्याची लेक युवराज्ञी जिऊ, म्हणजेच शंभुपत्नी महाराणी येसूबाई सरकार यांचे माहेर आहे. प्राचीन काळापासून शृंगारपूर हे ठिकाण ऐतिहासिक राजेशिर्के घराण्याच्या स्वराज्याची राजधानी होती. अशा पावन भूमीतून दिनदर्शिका प्रकाशित करण्यासाठी शृंगारपुरकरांनी शंभुसेना प्रमुख मा. दिपकराजे शिर्के यांची भेट घेत स्मारका संदर्भात सविस्तर चर्चा केली.
प्राचीन काळापासून मूळ शृंगारपुर मध्ये वास्तव्यास असलेले परंतु इ.सन. २ फेब्रुवारी १६८९ रोजी घडलेल्या ऐतिहासिक गनिमी काव्याच्या स्थलांतरित घडामोडीनंतर महाराणी येसूबाई यांच्या रक्ताच्या नात्यातील सर्व शिर्के मंडळी शृंगारपुरातून गनिमी स्थलांतर, वेषांतर करत शंभुराजांना सोडवण्यासाठी मौजे पेडगाव, तालुका - श्रीगोंदा, जिल्हा - अहमदनगर येथील किल्ले धर्मवीरगडा (बहादूरगड) पर्यंत आले, आज मितीस पेडगाव किल्ल्या नजीक स्थायिक झालेले दिसत आहेत. याच राजे शिर्के घराण्याच्या वंशजा कडून दिनदर्शिका प्रकाशित करण्याची अनेक दिवसापासून ग्रामस्थांनी इच्छा व्यक्त केली होती.
त्याप्रमाणे शृंगारपुर ग्रामस्थांनी महाराणी येसूबाईंच्या माहेरगावी शृंगारपूर येथे चिरकाल स्मरण व्हावे म्हणून येसूबाईंचे स्मारक होण्या संदर्भात स्थानिक पातळीवर समस्त शृंगारपुरकरां समवेत चर्चा करून पुढील नियोजन आखण्यासाठी दिपकराजे शिर्के यांना निमंत्रण ही देण्यात आले. शृंगारपुरकरांचे गाव भेटीचे निमंत्रण दिपकराजे शिर्के साहेबांनी तात्काळ स्वीकारत पुढे, बोलताना ग्रामस्थांना शब्द दिला की, माझे व शृंगारपूरचे प्राचीन काळापासून रक्ताचे नाते असून ते अधिक वृद्धिंगत होण्यासाठी मी व माझ्या पेडगावच्या समस्त शिर्के परिवाराकडून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शक्य होईल ती मदत करेल व राणी येसूबाई साहेबांचे स्मारक होण्याकामी आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे मागणी करेल असा ग्रामस्थांना विश्वास बोलून दाखवला.
प्रकाशन सोहळ्यासाठी पुणे येथील राजेशिर्के यांच्या लोहगाव संस्थेत शृंगारपूरातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. सुभेदार श्री. हरीदादा म्हस्के, श्री. मनेश म्हस्के, प्रमोद बिर्जे, श्री. गणेश म्हस्के, श्री. दिलीप म्हस्के, श्री. प्रविण म्हस्के, श्री. तेजस म्हस्के आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी समस्त शृंगारपुर करांनी दिपकराजे शिर्के साहेबांचा सत्कार केला. तसेच सैनिक सेलचे सरचिटणीस बाबासाहेब जाधव,चंद्रकांत ढेंबरे, चंद्रकांत गायकवाड यांनी ही शृंगारपुर वासियांचा सन्मान केला. कार्यक्रमास अनेक पदाधिकारी,प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते. वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष