क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला अपघात

By : Polticalface Team ,30-12-2022

क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला अपघात नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू ऋषभ पंतच्या कारला दिल्लीहून घरी परतत असताना अपघात झाला. अपघातांनंतर जखमी झालेल्या ऋषभला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे.

शुक्रवारी सकाळी भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत दिल्लीहून रुरकीच्या दिशेने कारमधून येत होता. त्याची कार नरसन शहराजवळ आल्यावर गाडीचे नियंत्रण सुटले आणि रेलिंग आणि खांब तोडून कार उलटली. यानंतर त्याच्या कारला आग लागली. तोपर्यंत गावकरी आणि पोलीसही घटनास्थळी पोहोचले.

अपघाताची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या गाडीने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. घाईगडबडीत क्रिकेटपटू ऋषभ पंतला दिल्ली रोडवरील सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथून त्याला डेहराडूनला स्थलांतरित करण्यात आले आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ पंत स्वत: गाडी चालवत होता. गाडी चालवताना झोप आल्याने हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. ऋषभ पंत गाडीत एकटाच होता.

अपघाताची माहिती मिळताच देहात पोलीस अधीक्षक स्वप्ना किशोर सिंह घटनास्थळी पोहोचल्या. दरम्यान डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतच्या डोक्यावर आणि पायाला दुखापत झाली आहे. डॉ. सुशील नागर यांनी सांगितले की, सध्या ऋषभ पंतची प्रकृती स्थिर आहे. त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष