पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन

By : Polticalface Team ,30-12-2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा (हिराबेन मोदी) यांचं निधन झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शुक्रवारी सकाळी ही माहिती देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचे निधन झाले.

मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, तेजस्वी शतक देवाच्या चरणी विसावतो... आईमध्ये मला ते त्रिमूर्ती नेहमीच जाणवते, ज्यामध्ये एका तपस्वीचा प्रवास आहे, निस्वार्थी कर्मयोगी आणि मूल्यांसाठी वचनबद्ध जीवनाचे प्रतीक आहे. त्यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी एक गोष्ट सांगितली होती, जी नेहमी लक्षात ठेवली जाते की शहाणपणाने काम करा आणि शुद्धतेने जीवन जगा.

हिराबेन मोदी यांची प्रकृती बुधवारी सकाळी खालावली. त्यांना तातडीने अहमदाबाद येथील यूएन मेहता शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर पंतप्रधान मोदी दुपारी दिल्लीहून थेट अहमदाबादच्या यूएन मेहता हॉस्पिटलमध्ये पोहोचले. माताजींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते दीड तास येथे राहिले आणि प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर संध्याकाळी ते दिल्लीला परतले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, हिराबेन मोदी यांचं अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. हिराबेन यांचा 18 जून रोजी 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदी अहमदाबादला रवाना झाले आहेत.

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हिराबा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. याशिवाय गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही हिराबेन मोदी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

हिराबा संघर्षांना आव्हान देत राहिले हिराबाचा जन्म पालनपूरमध्ये झाला, लग्नानंतर त्या वडनगरला शिफ्ट झाल्या. हिराबाचे लग्न झाले तेव्हा त्या अवघ्या 15-16 वर्षाच्या होत्या. घरची आर्थिक व कौटुंबिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्यांना शिक्षणाची संधी मिळाली नाही. पण त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी इतरांच्या घरी काम करण्यासही होकार दिला. फी भरण्यासाठी त्यांनी कधीही कोणाकडून पैसे घेतले नाहीत. हिराबाची इच्छा होती की आपल्या सर्व मुलांनी लिहून वाचन करून शिकावे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी