विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल

By : Polticalface Team ,30-12-2022

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल
पुणे : विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्ग क्रमांक ६० वरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ३१ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे आदेश पुणे शहरचे पोलीस उप-आयुक्त वाहतूक विजयकुमार मगर यांनी जारी केले आहेत.

स्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायींची वाहने वगळून पुण्याकडून अहमदनगर बाजूकडे जाणारी वाहतूक ही खराडी बायपास येथून उजवीकडे वळून केशवनगर मुंढवा चौक, मगरपट्टा चौक, डावीकडे वळून पुणे सोलापूर महामार्गाने केडगाव चौफुला, न्हावरा, शिरुर मार्गे नगररोड अशी जातील.

सोलापूर रोडवरून आळंदी, चाकण या भागात जाणारी वाहतूक हडपसर मगरपट्टा चौक येथे उजवीकडे वळून खराडी बायपासमार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी व चाकण येथे जाईल.

मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव आळेफाटा मार्गे अहमदनगर अशी जातील. मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी हलकी वाहने (कार, जीप) वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूर मार्गे अहमदनगर अशी जातील.

कोल्हापूर, सांगली, सातारा, कात्रज मार्गे मंतरवाडी फाटा, मगरपट्टा चौक येथून नगरकडे जाणारी वाहने हडपसर - पुणे सोलापूर महामार्गाने केडगाव चौफुला, न्हावरा, शिरुर मार्गे नगररोड अशी जातील.

इंद्रायणी नदीवरील आळंदी-तुळापूर हा पूल १० जानेवारी २०२२ रोजी जड वाहनांनाकरीता बंद करण्यात आला असल्याने या ठिकाणाहून केवळ अनुयायांच्या हलक्या चारचाकी वाहनांना प्रवेश दिला जाईल. अनुयायांच्या जड वाहनांनी चाकण-शिक्रापूर मार्गाचा वापर करावा.
सोहळ्यासाठी वाहनतळे निश्चित

विजयस्तंभ अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी वाहन पार्किंगस्थळेही या आदेशानुसार निश्चित करण्यात आली आहेत. पार्किंगच्या ठिकाणापासून जयस्तंभापर्यंत जाण्यासाठी पीएमपीएमएल बसेसची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणीच अनुयायांनी आपली वाहने पार्क करण्याचे आवाहनही मगर यांनी केले आहे.
पुण्याकडून येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी पार्किंगची ठिकाणे कार पार्किंग

आपले घर शेजारी हनुमंत कंद यांचा प्लॉट तसेच संदीप सातव यांचा प्लॉट लोणीकंद, लोणीकंद बौद्धवस्ती शेजारी सागर गायकवाड यांचा प्लॉट, तुळापूर फाटा स्टफ कंपनी शेजारी मोकळा प्लॉट, सामवंशी अकॅडमी समोर थेऊर रोड, खंडाबाचा माळ
खासगी बस पार्किंग-

आपले घर सोसायटीच्या मागील प्लॉट.

१ जानेवारी रोजी पुणे आणि थेऊरकडून येणाऱ्या अनुयायांच्या वाहनांची वर्दळ जास्त असल्याने लोणीकंद चौकात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून लोणीकंदकडून खंडोबा माळ आणि सामेश्वर पार्किंगकडे जाणारा मार्ग पीएमपीएमएल बसेस वगळता इतर वाहनांसाठी एकेरी राहील.
आळंदीकडून येणाऱ्या वाहनांकरिता पार्किंगची ठिकाणे

कार पार्किंग- तुळापूर रोड वाय पॉईंट समोरील पार्किंग, फुलगाव सैनिकी शाळा मैदान
थेऊर, सोलापूरकडून येणाऱ्या वाहनांकरिता पार्किंगची ठिकाणे

कार पार्किंग- खंडोबाचा माळ
अष्टापूर डोंगरगावडून येणाऱ्या वाहनांकरिता पार्किंगची ठिकाणे

कार पार्किंग- पेरणे गाव छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील मोकळे मैदान
दुचाकींसाठी पार्किंगची ठिकाणे

तुळापूर फाटा संगमेश्वर हॉटेलच्या मागे मेन चौक, टाटा मोटर्स शोरुमचे मोकळे मैदान, टाटा मोटर्स शोरुमशेजारील मोकळे मैदान, पेरणे पोलीस चौकी मागील मोकळे मैदान, ज्योतिबा पार्क गो शाळेच्या शेजारील प्लॉट

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष