काष्टी ग्रामपंचायतीत राजकीय नाट्य सुरूच; नवनिर्वाचित दहा सदस्यांचे राजीनामे
By : Polticalface Team ,30-12-2022
अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायतची निवडणूक होऊन आठवडा होत आला तरी तेथील राजकीय नाट्य काही थांबताना दिसत नाही. काल (गुरुवारी) उपसरपंच पदासाठी गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक झाली.
यात आमदार बबनराव पाचपुते यांच्या गटातील एक सदस्य फटल्याने साजन पाचपुते गटाचा उमेदवार उपसरपंच झाला. त्यामुळे नाराज झालेल्या बबनराव पाचपुतेंच्या गटातील सर्व दहा ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिले आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत उपसरपंच पदासाठी बबनराव पाचपुते यांच्या गटाचे स्पष्ट बहुमत असताना एक सदस्य फुटला. त्यामुळे आमदार पाचपुते यांना मोठा धक्का बसला आहे. उपसरपंच हा साजन पाचपुते यांच्या गटाचा झाला.
बबनराव पाचपुतेंच्या गटातील कोणता सदस्य फुटला हे कळण्यास मार्ग नसल्याने त्यांच्या गटातील दहाही सदस्यांनी प्रतिज्ञापत्र देत आपले राजीनामे सरपंच साजन पाचपुते यांचेकडे सुपूर्त केले आहेत.
बबनराव पाचपुते यांच्या मुलाचा पराभव करत साजन पाचपुतेंनी सरपंच पद मिळविले. त्यानंतर उपसरपंच पदाच्या निवडणुकीत आमदार पाचपुतेंच्या गटातील सदस्य फोडत उपसरपंचपदही आपल्याच गटाचा करण्यात यशस्वी ठरले.
हे बबनराव पाचपुतेंसाठी मोठे राजकीय धक्के जमजले जात आहेत. राजीनामे देणाऱ्या सदस्यांत अश्विनी जितेंद्र पाचपुते, अलका शांताराम राहिंज, सुरज राहिंज, रेश्मा वसंत पाचपुते, सुभाष जयसिंग पाचपुते, संध्या आजिनाथ कोकाटे, कामिनी अनिल पवार, दादासाहेब गोरख कोकाटे, महेश दिलीप दरेकर, तनुजा शिवाजी गवळी यांचा समावेश आहे
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.