आमदाराच्या मुलाची व्यावसायिकाला धमकी; नाहीतर हातपाय तोडेन

By : Polticalface Team ,31-12-2022

आमदाराच्या मुलाची व्यावसायिकाला धमकी; नाहीतर हातपाय तोडेन संभाजीनगर : शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याने एका केटरिंग व्यावसायिकाला हातपाय तोडण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीये. वाढदिवसाच्या पार्टीचं शिल्लक बिल मागण्यासाठी सदर व्यावसायिकाने सिद्धार्थ याला फोन केला असता धमकी देण्यात आली आहे.

दरम्यान याबाबत सविस्तर माहिती अशी, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी 2017 साली आपल्या पुत्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला केटरिंग व्यावसायिक त्रिशरण गायकवाड यांना ऑर्डर दिली होती. ही ऑर्डर एकूण साडे चार लाख रुपयांची होती.

त्यातील काही रक्कम शिरसाट यांनी दिली. पण काही रक्कम शिल्लक राहिली. शिल्लक रकमेत त्यांना 75 हजारांची सूट दिली. त्यानंतर उर्वरित 40 हजार देण्याचं त्यांनी कबूल केलं. पण मी जेव्हा पैसे आणायला त्यांच्या कार्यालयात गेलो, तेव्हा त्यांनी मला केवळ 20 हजार रुपये दिले.

त्यानंतर मी आमदार शिरसाठ यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाठ यांना फोन केला असता, साहेबांनी दिले तेवढेच पैसे घे... आता पैसे मागू नको... तुला जर 40 हजार रुपये पाहिजे होते, तर मग आम्ही दिलेले 20 हजार रुपये तू का घेतले, असा प्रश्न विचारत तू जर असेच पैसे मागत राहिला तर तुझे हातपाय तोडेन, अशी उघड धमकीच सिद्धांत शिरसाट यांनी व्यावसायिक त्रिशरण गायकवाड यांना दिली.

दरम्यान सिद्धांत शिरसाट यांनी थेट हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचं बोललं जातंय. तशी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. घडलेल्या प्रकारावर आणि दिलेल्या धमकीवर आमदार संजय शिरसाट किंवा त्यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांचं कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी