By : Polticalface Team ,01-01-2023
आगीच्या स्फोटानंतर मोठा आवाज झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी व्यक्तींनी सांगितली. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीत काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. आगीत काही जण जखमी झाले होते त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आणि गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. धुराचे लोटच्या लोट हवेत उसळत असल्यानं परिसरात काळोखी पसरली आहे. आगीची तीव्रता भीषण असल्यानं त्यावर नियंत्रण मिळविण्यास अडचणी निर्माण होत आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर हालवले आहे. आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही. सध्या तरी आगीचे कारण शोधण्यापेक्षा आगिवर नियंत्रण कसे मिळवता येईल यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडली आहे.
नाशिक मुंबई महामार्गावर असलेल्या गोंदे गावाजवळ जिंदाल कंपनीचा प्लांट आहे. या प्लांटमध्ये आज बॉयलरचा मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की आजूबाजूच्या 20 ते 25 गावांमध्ये आवाज ऐकू आला. कंपनीत साधारण 2000 कर्मचारी कामाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोटाच्या घटनेत काही कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अद्यापही सविस्तर माहिती मिळाली नाही वाचक क्रमांक :