कर्करोगाशी झुंज अपयशी; आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

By : Polticalface Team ,03-01-2023

कर्करोगाशी झुंज अपयशी; आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन पुणेः भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर बाणेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. जगताप यांची गेल्या तीन वर्षांपासून कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. ते तीन टर्म आमदार राहिले आहेत. 2014 व 2019 मध्ये चिंचवड मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. तसेच महानगरपालिकेचे महापौरपदही त्यांनी भूषविले आहे.

काही दिवसांपूर्वी दुर्धर अशा आजारावर त्यांनी मात केली अस बोलले जात होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणादेखील होत होती. पण दिवाळीनंतर त्यांना पुन्हा प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले आहे. आज दुपारी तीन ते सहा या वेळेत पार्थिव अत्यंदर्शनासाठी त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी सात वाजता पिंपरी गुरव येथे अंत्यविधी होणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली.

मे महिन्यात झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी लक्ष्मण जगताप यांचे एक मत भाजपासाठी बहुमोल ठरले होते. आजारी असतानाही मुंबईला रुग्णवाहिकेतून येऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता. गेल्या आठवड्यात भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले होते. गेल्या काही दिवसांत भाजपच्या लढवय्या दोन आमदारांचे दुर्धर आजाराने निधन झाले आहे.

महापालिकेत राजकीय दबदबा जगताप यांची राजकीय कारकीर्दही काँग्रेसमधून सुरू झाली होती. पिंपरी चिंचवड महापालिकेत ते चार वेळा नगरसेवक राहिले आहेत. स्थायी समिती अध्यक्ष, महापौर अशी पदे भूषविली आहे. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षपद भूषविले होते. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदरासंघातून विधानपरिषदेवर २००४ मध्ये निवडून गेले होते. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर २००९, व त्यानंतर २०१४ व २०१९ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीवर ते आमदार झाले

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष