राजेंद्र प्रसाद विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती, बालिका दिन, माता पालक मेळावा उत्साहात संपन्न

By : Polticalface Team ,03-01-2023

राजेंद्र प्रसाद विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती, बालिका दिन, माता पालक मेळावा उत्साहात संपन्न लिंपणगाव (प्रतिनिधी )-- श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील डॉ. राजेंद्र प्रसाद विद्यालयामध्ये 3 जानेवारी क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तसेच बालिका दिन आणि माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती मंदाताई जावळे या होत्या. यावेळी स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती म्हणून आज जगती ... अमर हे सावित्री... अमर आहे सावित्री... " या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्रीमती मंदाताई जावळे यांनी स्वीकारावे अशी अध्यक्ष पदाची सूचना विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती काळे मॅडम यांनी मांडली .त्यासाठी अनुमोदन देण्याचे काम श्रीमती धराडे मॅडम यांनी केले. क्रांतीज्योती, ज्ञानज्योती, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा प्रथम शाळेतील विद्यार्थी गिरीष पुराणे, जगताप कार्तिक ,गायकवाड प्रतीक्षा, श्रेया इथापे ,वैष्णवी पाटील, आल्हाट समीक्षा, वाडगे साक्षी यांनी घेतला.

याप्रसंगी विद्यालयामध्ये उपस्थित असणाऱ्या माता पालक यापैकी सौ नीताताई पुराणे, धनलक्ष्मी मडके, वर्षाताई हिरवे ,रायकर अनुराधा, फराटे वैशाली, खामकर ताई यांनी शाळा आणि शाळेतील सर्व शालेय व्यवस्थापनातील घटक याविषयी माहिती सांगितली. विद्यालयातील शिक्षक कशा पद्धतीने ज्ञानदानाचे कार्य करतात. विद्यालयाच्या कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका कशा पद्धतीने विद्यार्थ्यांकडे शाळेकडे अतिशय चाणाक्षवृत्तीने लक्ष देतात. याची माहिती या ठिकाणी या पालकांनी अतिशय समर्पकपणे मांडली. . यावेळी विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती शितोळे मॅडम यांनी आपल्या भाषणातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील अनेक घटना त्याचबरोबर त्यांना शिक्षिका म्हणून कार्यरत असताना मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी किती त्रास सहन करावा लागला. त्यांनी आपले कार्य कशा पद्धतीने शिक्षणाचे कार्य अहोरात्र चालू ठेवले. याविषयी विद्यार्थ्यांना उदबोधित केले. ज्या काही समाजामध्ये अनिष्ट प्रथा होत्या त्या कशा बंद झाल्या याविषयी माहिती सांगितली. मुलींना शिकविले पाहिजे मुलगी जर शिकली तर ती सगळ्या कुटुंबाचा उद्धार करू शकते याची देखील माहिती श्रीमती शितोळे यांनी सांगितली.

यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अलका दरेकर मॅडम यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील ज्या काही शालेय व्यवस्थापनातील घटक आहेत त्या घटकांची माहिती विशद करताना त्या म्हणाल्या की,. शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कोणकोणते प्रयत्न करावे लागतील. हे त्या ठिकाणी आलेल्या सर्व माता-भगिनींना त्यांनी खूप समर्पकपणे माहिती सांगितली. त्याचबरोबर त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा विद्यार्थी व उपस्थित माता पालकांसमोर मांडला. अध्यक्षीय भाषणामध्ये श्रीमती मंदाताई जावळे यांनी क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा तर घेतलाच त्याचबरोबर त्यांनी एक सावित्रीबाई फुलें विषयी सुंदर गीत सुद्धा गायिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती उमा मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती शिर्के मॅडम यांनी केले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी