आरोपीस मरेपर्यत जन्मठेपेची शिक्षा व एकूण २०,००० /- दंड
By : Polticalface Team ,06-01-2023
दिनांक 6 जानेवारी 2023 श्रीगोंदा :
आरोपी नामे १) छबु ऊर्फ छबन पांडुरंग आखाडे २ सुदर ऊर्फ सुदरदास आखाडे रा. चिंचोली काळदात, ता. कर्जत, जि. अहमदनगर याने १२ वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरणी श्रीगोंदा येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एम. एस. शेख साहेब यांनी आरोपी १ यास भा.द.वि. ३७६ (२) (जे) (एन) अन्वये मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा व १०,०००/- रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास ६ महिने साधी कारावासाची शिक्षा तसेच लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ६ अन्वये मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा व १०,०००/- रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास ६ महिने साधी कारावासाची शिक्षा अशी शिक्षा सुनावली. तसेच आरोपी क्र. २ याची संशयाच्या अभावी भा.द.वि कलम ५०६ अन्वये निर्दोष मुक्तता केली. सदर खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी अभियोक्ता संगिता अनिल ढगे यांनी पाहिले.
घटनेची थोडक्यात हकीगत की, चिंचोली काळदात ता. कर्जत शिवारात दिनांक १०/०१/२०२२ रोजी १२.०० वा. चे सुमारास व २६ / ०१ / २०२२ रोजी सकाळी ११.३० वा. चे सुमारास आरोपी छबु ऊर्फ छबन पांडुरंग आखाडे, रा. चिंचोली काळदात ता. कर्जत, जि. अहमदनगर यांने अल्पवयीन बालिकास तिचे घरी असतांना तिचे घरात जावून तिचे तोंड एका हाताने दाबून मारुन टाकील अशी धमकी देऊन तिला त्याचे घरात घेऊन जाऊन तिचे घाबरल्याचा फायदा घेऊन तिचे अंगावरील कपडे काढून तिला त्याचे कॉटवर खाली झोपवून तिची छाती दाबून तिचे तोंडामध्ये तोंड घालून तिचे ओठ चावून तिचे अंगावर झोपून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व सदर प्रकार कोणाला सांगितला तर पिडीत आणि पिडीतेचे आईवडीलांना जिवे ठार मारीन अशी धमकी दिली. तसेच आरोपी क्र. २) सुंदर ऊर्फ सुंदरदास आखाडे यास पिडीतेच्या आईने सदरचा प्रकार सांगितला असता त्यांने केस मागे घ्या नाहितर तुमच्या विरुध्द अनुसुचित जाती जमाती कायद्या खाली केस दाखल करिल अशी धमकी दिली. मुळ फिर्यादीने (बालकाची आईने) आरोपी विरुध्द कर्जत पोलिस स्टेशन येथे गु.र.न. १४०/ २०२२ नुसार लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षणस अधि नियम २०१२ (POCSO) व भा.द.वि. कलम ३७६ ५०६ अन्वय गुन्हा नोंदविला. सदर गुन्ह्याचा तपास पुर्ण झाल्यानंतर आरोपीं विरुध्पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे यांनी मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी मा. जिल्हा न्यायाधीश- १ श्री. मुजीब. एस. शेख साहेब यांच्या न्यायालयात झाली.
सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकुण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये बालिका, वैद्यकीय अधिकरी, तपासी अधिकारी, पोलिस ठाणे अंमलदार, पंच व चिंचोली काळदात प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अतिरीक्त सरकारी वकील सौ. संगिता अनिल ढगे यांनी काम पाहिले. मा. न्यायालयासमोर आलेला साक्षी - पुरावा व सरकारी वकील सौ. संगिता अनिल ढगे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन मा. न्यायालयाने आरोपींना वरील प्रमाणे शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी आशा खामकर तसेच पोलिस कॉन्स्टेबल गणेश काळाणे यांनी सहकार्य केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.