मंदिरातील देवाची सेवा केल्यास आई-वडील भेटणार नाहीत परंतु आई-वडिलांची सेवा केल्यास देव नक्कीच भेटेल- ह. भ. प. सौ. विद्याताई जगताप

By : Polticalface Team ,07-01-2023

मंदिरातील देवाची सेवा केल्यास आई-वडील भेटणार नाहीत परंतु आई-वडिलांची सेवा केल्यास देव नक्कीच भेटेल- ह. भ. प. सौ. विद्याताई जगताप
लिंपणगाव (प्रतिनिधी)- मंदिरातील देवाची सेवा केल्यास आई-वडील भेटनार नाहीत, परंतु आई-वडिलांची सेवा केल्यास नक्कीच देव भेटेल असे प्रतिपादन आनंदगड वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा ह.भ.प. सौ.विद्याताई जगताप यांनी केले. मढेवडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते कै.आनंदराव रामभाऊ शिंदे उर्फ अण्णा यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

सहकार महर्षी नागवडे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हॉ. चेअरमन आणि विद्यमान संचालक सुभाष काका शिंदे यांचे वडील कै.आनंदराव शिंदे उर्फ अण्णा यांचे प्रथम पुण्यस्मरण मढेवडगाव येथे संपन्न झाले या कार्यक्रमात सौ विद्याताई यांनी किर्तनरुपी सेवा श्रद्धांजली समर्पित केली. मनुष्य जन्माला आल्यानंतर माणसाने नित्य कर्म करताना परमेश्वर भक्ती केली पाहिजे हे जरी खरे असले तरी त्याबरोबरच मातापित्यांची मनोभावे सेवा करावी.समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या न्यायाने कार्य केले पाहिजे स्व.अण्णांनी ते त्यांच्या हयातीत केले. अण्णांनी गावातील शाळा सुरू करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील कार्यालयात सहकाऱ्यांसोबत ठिय्या मांडला आणि गावामध्ये शाळा सुरू झाली.लोकांना बरोबर घेऊन लोकवर्गणी करून गावात विशाल विठ्ठल मंदिर उभारणी केली.त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणिअध्यात्मिक क्षेत्रात अलौकिक कार्य केले. दिन दलित, गरीब दुबळ्यांची सेवा करताना ब्लेंकेट वाटप करून मायेची ऊब दिली,गावातील प्रत्येक कुटुंबालाआंबा रोपांचे वाटप केले, संगमरवरी छोटे दत्त मंदिर वाटप,पाण्याच्या टाक्या वाटप,असे अनेक सामाजिक उपक्रम राबविले तोच वारसा सुभाष काका,त्यांची सर्व मुलं ,नातवंड पुढे चालवत आहेत.

या कार्यक्रम प्रसंगी कुकडी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार राहुल दादा जगताप, सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस,जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधा ताई नागवडे ,जिल्हा काँग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे,कर्जत तालुका काँग्रेस चे अध्यक्ष किरण पाटील,केशवराव मगर, भगवान पाचपुते,दिपक भोसले,सुभाष कळसकर आदिंनी श्रद्धांजली पर मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी प्रतापसिंह पाचपुते संदीप नागवडे , बाळासाहेब शेलार, साहेबराव वाबळे, सुवर्णाताई पाचपुते ,बाळासाहेब महाडिक राजेंद्र आबा म्हस्के,प्राचार्य डॉ सतिश्चंद्र सूर्यवंशी, धर्मनाथ काकडे,तसेच कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, विविध संस्थेचे चेअरमन,सरपंच, संचालक,नातेवाईक ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी