छत्रपती शिवाजी कॉलेजमधील प्रा. सुद्रिक यांचा आंतराष्ट्रीय जर्नल मध्ये शोधनिबंध प्रसिद्ध.

By : Polticalface Team ,07-01-2023

छत्रपती शिवाजी कॉलेजमधील प्रा. सुद्रिक यांचा आंतराष्ट्रीय जर्नल मध्ये शोधनिबंध प्रसिद्ध.
लिंपणगाव( प्रतिनिधी )--श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी कॉलेजमधील रसायनशास्त्र विभागातील प्रा. विलास सुद्रिक यांचा ४ जानेवारी २०२३ रोजी "स्टिरीपेंटॉल" हे औषध औद्योगिकदृष्ट्या तयार करण्याच्या नवीन मेथड चा शोधनिबंध ओरिएंटल जर्नल ऑफ केमिस्ट्री या आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये नुकताच प्रसिद्ध झाल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सुर्यवंशी यांनी दिली. हे जर्नल विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता असलेले नामांकीत जर्नल आहे.

छत्रपती कॉलेजमधील पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त रसायनशास्र विभागाच्या संशोधन केंद्रातुन हे सर्व काम पूर्ण केले.त्यांच्या नावावर याआधी एकूण ४ पेटंट आहेत.

"डायकोमिट" या ब्रँड नावाखाली विकल्या जाणार्‍या स्टिरीपेंटॉल हे औषध, इंग्रजीत एपिलेप्सी…मराठीत अपस्मार.. यालाच बोली भाषेत फीट येणे किंवा आकडी येणे या आजारावर उपचार करण्यासाठी वापरले जाणारे अँटीकॉनव्हलसंट औषध आहे—एक गंभीर अनुवांशिक मेंदू विकार. ऑगस्ट २०१८ मध्ये, स्टिरिपेंटॉलला अमेरिकेतील यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) ने अपस्मार आजारासाठी अतिरिक्त उपचार म्हणून मान्यता दिली २०२० पर्यंत, अंदाजे ५ कोटी लोकांना एपिलेप्सी आजार आढळून आला. विकसनशील देशांमध्ये सुमारे ८०% प्रकरणे आढळतात. २०१५ मध्ये, यामुळे १२५,००० मृत्यू झाले, जे १९९० मध्ये ११२,००० होते.

हे मेंदूच्या ऊतींमध्ये गाबा पातळी वाढवते, त्याचे पुनरुत्पादन आणि चयापचय मध्ये हस्तक्षेप करते हे देखील दर्शविले गेले आहे. विशेषतः, हे न्यूरॉन्सच्या ऊर्जा चयापचयात सामील असलेले एक महत्त्वाचे एन्झाइम, लैक्टेट डिहायड्रोजनेजला प्रतिबंधित करते असे दिसून आले आहे. या संशोधनाकरता डॉ.शामराव लवांडे ,डॉ. ज्ञानेश्वर कर्पे ,विभागप्रमुख प्रा.मनोहर सुर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे,नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, सौ. अनुराधाताई नागवडे, सेक्रेटरी, निरीक्षक सचिनराव लगड, सर्व विश्वस्थ, कॉलेजचे प्राचार्य डॉ.सतिशचंद्र सुर्यवंशी व कॉलेजमधील सर्व कर्मचारी वृदांनी अभिनंदन केले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष