By : Polticalface Team ,07-01-2023
पुढे बोलताना ढिकले म्हणाले की,आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त 6 जानेवारी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जात असून तालुक्यातील पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जबाबदारी निर्भीडपणे उत्तम पद्धतीने पार पाडीत आहेत.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राम जगताप यांनी बोलताना सांगितले की, आज पत्रकारांमुळे समाजातील प्रश्न समोर येत आहे त्यातून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी लोंढे यांनी सर्व पत्रकारांना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. दरम्यानच्या काळात माजी आमदार राहूल जगताप यांच्या वतीने पत्रकारांचा मान सन्मान करणयात आला तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनीही पत्रकारांचा सन्मान केला. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या गटाचे तालुका प्रमुख बाळासाहेब दूतारे,संतोष खेतमाळीस हरीभाऊ काळे, देशमुख सर तसेच जिल्हा सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख यांनी तर श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या वतीने व पंचायत समिती श्रीगोंदा यांच्या वतीने मान सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाअध्यक्ष अंकुश शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद आहेर यांनी केले तर आभार दादासाहेब साहेब यांनी मानले. वाचक क्रमांक :