यवत खुटबाव मार्गावर साळोबा वस्ती येथे भिषण अपघात, एक जखमी तर दोन युवकांचा कार खाली चिरडुन मृत्यू

By : Polticalface Team ,07-01-2023

यवत खुटबाव मार्गावर साळोबा वस्ती येथे भिषण अपघात, एक जखमी तर दोन युवकांचा कार खाली चिरडुन मृत्यू दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता ०६ जानेवारी २०२३ रोजी यवत खुटबाव मार्गावर साळोबावस्ती येथे कारच्या धडकेने दोन युवकांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना दिनांक ०६/०१/२०२३ रोजी सायं ७:३० वा,सु, घडली या संदर्भात यवत पोलीस स्टेशन येथे फिर्यादी आकाश ज्ञानदेव खंकाळ रा खुटबाव साळोबावस्ती ता दौंड जिल्हा पुणे, यांनी तक्रार दाखल केली असल्याने पोलीसांनी गु,नं २८/२०२३, भा द वि कलम ३०४, २७९, ३३७, ३३८, १८४, १३४, १७७, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे, यवत पोलीस स्टेशन हद्दीतील यवत खुटबाव मार्गावर साळोबावस्ती येथे खुटबाव बाजुकडुन यवत बाजुकडे कार फोर व्हीलर येत असताना हा भिषण अपघात झाला, वाहन चालक आरोपी आकाश अनिल जगताप रा यवत खुटवड वस्ती ता दौंड जिल्हा पुणे, कार नंबर एम एच १२ यु यु २९९९ या वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खुटबाव साळोबावस्ती येथिल ओढ्याच्या पुलावर प्रथम अपघातात बाळु सखाराम शिंदे याला जोरदार धडक देऊन कार चालक आरोपी आकाश अनिल जगताप तसाच भरधाव वेगाने पुढे निघून जात असताना वस्तीतील रहिवासी ज्ञानदेव लाला खंकाळ, वय ६४ वर्ष व ज्ञानदेव गुलाब शेळके वय ४० वर्ष दोन्ही राहणार खुटबाव साळोबा वस्ती, या दोघांना पाठिमागुन कार फोर व्हीलर गाडीने जोरदार धडक देऊन दोन इसमांना वाहनाच्या खाली फरफटत लांबवर नेले असल्याने दोघांनाही हात पाय व डोक्याला गंभीर दुखापत झाली वाहन चालकाने जखमींना न पाहता तसेच पुढे वेगाने पळुन गेला त्या वेळी साळोबा वस्तीतील रहिवासी सुनिल दत्तु फासगे, कृष्णा बाळू जाधव, लक्ष्मण भगवान चव्हाण, या तरुणांनी कार फोर व्हीलर गाडी व चालकास पाहिले असल्याचे सांगितले व सदर जखमी ज्ञानदेव लाला खंकाळ व ज्ञानदेव गुलाब शेळके यांना यवत ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापुर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

फिर्यादी यांचे वडील ज्ञानदेव लाला खंकाळ व त्यांचे ओळखिचे ज्ञानदेव गुलाब शेळके आणि फिर्यादी यांची पत्नी प्रियंका खंकाळ, साळोबा वस्ती मधिल राहत असलेल्या नारायण चव्हाण यांच्या नातवाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी चालले होते त्या वेळी हि दुर्घटना घडली वाहन चालकाने लोकवस्ती मध्ये भरधाव वेगाने वाहन असल्याने सदर अपघात झाला, फिर्यादीचे वडील ज्ञानदेव लाला खंकाळ व ज्ञानदेव गुलाब शेळके या दोन युवकांचा कार खाली चिरडुन अपघाती मृत्यू झाला, प्रथम कार अपघातातील बाळु सखाराम शिंदे यालाही गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, वाहन चालक आकाश अनिल जगताप हा यवत खुटवड वस्ती येथे जवळच राहत असल्याने ओळखिचा असल्याचे घटना स्थळी जमलेल्या नागरिकांच्यात चर्चा सुरू होती,यवत पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तपाशी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांनी सदर प्रकरणी सखोल चौकशी करून पुढील कार्यवाही तपास करीत आहेत.

यवत खुटबाव मार्गावर अपघामध्ये मृत्यू झालेल्या दोन्ही परिवार यांच्या घरी येऊन दौंड तालुका माजी आमदार रमेश थोरात यांनी भेट दिली व सांत्वन केले, या दोन्ही युवकांचा अंतिम संस्कार एकाच वेळी साळोबावस्ती येथिल स्मशानभूमीत करण्यात आले, या वेळी युवा नेते तुषार दादा थोरात, यांनी दौंड तालुका माजी आमदार रमेश थोरात यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली, तसेच खुटबाव ग्रामपंचायत सरपंच शिवाजी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब डोंबाळे, माजी सदस्य अशोक चव्हाण, बुवा माकर,राजे उमाजी नाईक संघटनेचे दौंड तालुका अध्यक्ष दशरथ खोमणे, तसेच फुले शाहू आंबेडकर चळवळीतील पुणे शहर भारतीय बौद्ध महासभा खजिनदार संजय शिंदे, ऑल इंडिया पॅंथर सेना शहराध्यक्ष नानासाहेब ओव्हाळ, साम्राज्य संघटना संस्थापक अध्यक्ष अंबादास कांबळे, भीम छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामराव गायकवाड, उपाध्यक्ष निलेश गायकवाड, नितीन शेलार, भाऊसाहेब आव्हाड, विकी भाई चट्टाले, संघभुषण साखरे,या विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष