चिंबळे येथील साई सेवा बहुउद्देशीय प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या साईभूषण पुरस्काराचे वितरण संपन्न
By : Polticalface Team ,09-01-2023
चिंबळे येथील साई सेवा बहुउद्देशीय प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या साईभूषण पुरस्काराचे वितरण काल दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी पार पडले यावर्षी सहकार क्षेत्रात काम करणारे श्री मिठूशेठ पर्वती शिंदे व कला व सांप्रदायिक क्षेत्रात आपले मोलाची योगदान देणारे काष्टी येथील यासीन भाई तांबोळी यांना तर औद्योगिक क्षेत्रातून चिंभळे येथील वसंत शामराव सावंत आणि क्रीडा क्षेत्रातून वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या आश्विनी दळवी यांना साई भूषण 2022 पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
याचबरोबर संस्थेच्या हंगेश्वर पब्लिक स्कूल व के.पी. जाधव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेहसंमेलन पार पडले.
यावेळी श्री अनिल शिंदे साहेब गटशिक्षणाधिकारी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संतोष काकडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. सचिन जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले प्राध्यापक कुताळ सर आणि प्रमोद आहेर यांनी सूत्रसंचालन केले तर प्राचार्य जालिंदर मोहिते यांनी वार्षिक अहवाल वाचन केले आणि संस्थेचे सचिव डॉ. शुभांगी जाधव यांनी आभार मानले.
वाचक क्रमांक :