पत्रकारांनी साधला विद्यार्थ्यांशी सुसंवाद ॥ पत्रकार दिनानिमित्त पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांची देशमुखवस्ती आदर्श शाळेस भेट

By : Polticalface Team ,09-01-2023

पत्रकारांनी साधला विद्यार्थ्यांशी सुसंवाद ॥                                          पत्रकार दिनानिमित्त पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांची देशमुखवस्ती आदर्श शाळेस भेट लिंपणगाव ( प्रतिनिधी ) समाजातील घडामोडींचा परामर्श घेणारे पत्रकारच जेव्हा शाळेत येतात, विद्यार्थ्यांशी विविध प्रश्न विचारून त्यांच्याशी संवाद साधतात . त्यांच्यामध्ये रमतात, ही गोष्टच चिमुकल्यांच्या दृष्टीने अनोखीच म्हणावी लागेल. पत्रकार नंदकुमार कुरुमकर हे शैक्षणिक, सामाजिक वैशिष्ट्यपूर्ण लेखनात नेहमीच अग्रेसर असतात. त्यांनी पत्रकार दिनानिमित्त विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. तुम्हाला काय आवडते, तुमचे आदर्श कोण आहेत, आवडते गाणे म्हणा इंग्रजीमध्ये फळ्यावर गावाचे नाव टाकले ते ओळखून धाडसाने सांगून विद्यार्थ्यांनी समर्पकाशी उत्तरे दिली. असे विचारून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थी खूप खूश झाले. हा एक वेगळाच अनुभव मुलांना आला. शाळेतील लोकसहभागातून मिळवलेल्या विविध सुविधा पाहून त्यांनी पालक व ग्रामस्थांच्या योगदानाचे कौतुक केले. शालेय मंत्रिमंडळातील शिस्तमंत्री सई प्रकाश वाबळे हिने त्यांचे स्वागत केले.

नुकताच दोन दिवसापूर्वी पत्रकार दिन झाला. त्या पवित्र दिनी पत्रकारांचा सन्मान व्हावा, ही अपेक्षा देशमुख वस्ती या आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांची होती त्या निमित्त पत्रकार कुरुमकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. प्रसंगी राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श मुख्याध्यापक रामदास ठाकर यावेळी बोलताना म्हणाले की, श्रीगोंदा तालुक्याच्या विकासामध्ये सर्वच पत्रकारांचे काम उल्लेखनीय आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नात जातीने लक्ष घालून तो प्रश्न मार्गी लागेपर्यंत पाठपुरावात करण्याची भूमिका पत्रकारांची असते. त्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांचे देखील नाव अग्रेसर आहे. त्यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक शाळेला न्याय देण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांनी राबवलेले विविध उपक्रम त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम जेष्ठ पत्रकार कुरुमकर हे नेहमीच करतात समाज हित डोळ्यासमोर ठेवून पत्रकारिता करत असताना शिक्षण क्षेत्राला प्रथम न्याय देण्याची भूमिका कुरुमकर यांनी अंगीकारली आहे. त्यातून विद्यार्थ्यांना एक" नवी दिशा व नवी आशा" निर्माण होऊन आजचे बालक उद्याचे देश चालक व्हावेत ही अपेक्षा पत्रकारांची असते. एक लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून सर्वसामान्य जनता त्यांच्याकडे आतुरतेने पाहते. ते पवित्र काम पत्रकारांकडून होत आहे. ही अभिमानास्पद बाब असल्याचे मुख्याध्यापक रामदास ठाकरे यांनी म्हटले आहे. . यावेळी मुख्याध्यापक रामदास ठाकर विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते. .

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी