महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ उद्यापासून 25 जानेवारीपर्यंत राबविणार सुरक्षितता अभियान मोहीम कार्यक्रम- करमाळा आगार प्रमुख अश्विनी किरगत यांची माहिती

By : Polticalface Team ,10-01-2023

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ उद्यापासून 25 जानेवारीपर्यंत राबविणार सुरक्षितता अभियान मोहीम कार्यक्रम- करमाळा आगार प्रमुख अश्विनी किरगत यांची माहिती करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ उद्यापासून 25 जानेवारी पर्यंत सुरक्षितता अभियान कार्यक्रम राबविणार असल्याची माहिती करमाळा एसटी आगार प्रमुख अश्विनी किरगत यांनी बोलताना माहिती दिली याबाबत अधिक माहिती देताना श्री किरगत पुढे बोलताना म्हणाले की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे प्रवाशांची सुरक्षित वाहतुक करणारे महामंडळ आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात राज्यभरात अपघात सुरक्षितता अभियान राबविण्यात येते. यावर्षी देखील 11/01/2023 ते 25/01/2023 या कालावधीत रा.प.महामंडळाकडून सुरक्षितता अभियान राबविण्यात येणार आहे. सदर कालावधीत रा. प. कर्मचाऱ्यांसाठी प्रबोधनपर भाषणे आयोजित करण्यात येतील. असे ते म्हणाले या सुरक्षितता अभियानाचे महत्वाचे उद्देश पुढील प्रमाणे आहेत.

1. प्रवाशांमध्ये सुरक्षित प्रवासाबद्दल विश्वास वृद्धिंगत करणे. 2. सर्व रा. प. कर्मचाऱ्यांना सुरक्षित प्रवासी वाहतुकीच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे. 3. सुरक्षित वाहतुकीसाठी घालून दिलेल्या कार्यपद्धती पाळण्यावर भर देणे. 4. रा.प.वाहनाना अपघात होणार नाहीत, यासाठी नेहमी योग्य ती काळजी घेणे.

या कालावधीत सर्व कर्मचाऱ्यांच्या बैठका घेण्यात येतील. रा.प.वाहनांचे अपघात होऊ नये तसेच वाहतुकीचे सर्व नियम पाळण्याबाबत फक्त सुरक्षितता अभियानात नव्हे तर सदैव काळजी घेण्यासाठी हे एक उजळणी अभियान आहे. तसेच प्रवाशांसाठी काही मार्गदर्शनपर सूचना देखील आहेत. सर्व प्रवाशांचा प्रवास सुखकर व सुरक्षित होण्यासाठी रा.प.महा मंडळाला सहकार्य करा.बसच्या खिडकी मधून बस मध्ये सामान टाकू नका.बस च्या सीट्स चे कुशन्स खराब करू नका. बस मध्ये अनोळखी सामान आढळून आल्यास ताबडतोब ही गोष्ट कामगिरीवरील वाहकाच्या किंवा स्थानकप्रमुखांच्या निदर्शनास आणून द्या. तसेच बस मध्ये थुंकू नका. बस व बस स्थानक परिसर स्वच्छ ठेवा. रा. प. परिवहन बस स्थानकानावरील स्वच्छतागृहाचा वापर केल्यावर पाण्याचा योग्य वापर करावा.

रा. प. कर्मचारी व सर्व प्रवाशी यांच्या सहयोगाने हे रस्ते सुरक्षितता अभियान तसेच स्वच्छ बस, सुंदर बस स्थानक व टापटीप प्रसाधन गृह हे अभियान आपण चांगल्या रीतीने राबवू, असा विश्वास आगार व्यवस्थापक अश्विनी किरगत व करमाळा आगार प्रशासनाने व्यक्त केला आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी