उपटसुंभ लोकांवर मी उत्तर देणार नाही, अजित पवार संतापले
By : Polticalface Team ,11-01-2023
मुंबई : बारामतीचे पवार चुलते पुतणे म्हणजे चोरट्यांची टोळी आहे. राज्याची तिजोरी त्यांनी लुटून खाल्ली. शरद पवार म्हणजे जाणता राजा नसून नेणता राजा आहे, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. या प्रश्नावर पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच संतापले.
अजित पवार म्हणाले, तो कोण कुठला उपटसुंभ, त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी काय रिकामा आहे काय? माझ्याकडे खूप काम आहे, अशा शब्दात त्यांनी पडळकरांवर हल्ला चढवला तर जनमाणसात ज्यांची प्रतिमा आहे, अशा लोकांवर तुम्ही प्रश्न विचारत चला, असा सल्ला अजितदादांनी माध्यम प्रतिनिधींना दिला.
कृषी प्रदर्शनावरुन पडळकर यांनी पवारांना लक्ष्य केलं होतं. यावर अजितदादा म्हणाले, तुम्ही ज्या माणसाबद्दल मला प्रश्न विचारताय तो काय एवढा मोठा नेता नाहीये. त्याने बोलावं आणि मी उत्तर द्यावं, असं होणार नाही. कोण कुठला उपटसुंभ, त्याचं डिपॉझिट जप्त करुन मी त्याला पाठवलंय..." अशा शब्दात अजितदादांनी टीकास्त्र डागलं.
"कृषी प्रदर्शनात शरद पवार यांनी शेतकऱ्यांना पैसे मागितले, असा गंभीर आरोप पडळकरांनी पवार यांच्यावर केला होता. त्यावर बोलताना अजित पवार यांनी पडळकरांना थेट चॅलेंजच दिलं. ज्या कोणत्या माणसांना पवार साहेबांनी पैसे मागितले, त्यांना समोर उभं करा, मी राजकारण सोडून देतो... आहे का त्याची हिम्मत राजकारण सोडण्याची...", असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला.
त्याचवेळी माध्यम प्रतिनिधींनी देखील जनमाणसात ज्याची प्रतिमा आहे, त्यांच्याबद्दल प्रश्न विचारावे. आम्ही त्यांच्याबद्दल नक्की उत्तरं देऊ, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी