By : Polticalface Team ,12-01-2023
12157-58 हुतात्मा इंटरसिटी व पुणे - कन्याकुमारी या गाड्यांना जेऊर स्थानकावर तातडीने थांबा देण्यात यावा,. तिकीट खिडकी शेजारी दुसरा फूट ओव्हर ब्रीज बसवण्यात यावा,. प्लॅटफॉर्म क्रमांक 1. व 2. वर 700.स्क्वेअर मीटर निवारा शेड बसविण्यात यावेत., या प्रमुख मागणीसाठी उद्या बैठकीचे आयोजन केले असल्याची माहिती जेऊर येथील सामाजिक कार्यकर्ते सुहास सूर्यवंशी यांनी दिली
जेऊर येथे रेल्वे स्टेशनवर हुतात्मा इंटरसिटी तसेच पुणे कन्याकुमारी एक्सप्रेस या दोन्ही रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा यासाठी गेली कित्येक महिन्यापासून जेऊर येथील रेल्वे प्रवासी संघटना तसेच व्यापारी वर्ग याशिवाय जेऊर ग्रामस्थ रेल्वे रेल्वे शासन दरबारी प्रयत्न करीत आहे मात्र रेल्वे प्रशासनाने जेऊरकरांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे पहावयास मिळत आहे केम या ठिकाणी सुपरफास्ट रेल्वे ना थांबा मिळतो तर जेऊर येथे का मिळत नाही व आमच्यावर असा दुजाभाव का असा प्रश्न जेऊरकर सध्यातरी करीत आहे तेव्हा दिनांक 12 जानेवारीच्या होऊ पाहणाऱ्या रेल्वे प्रशासन व जेऊर येथील व्यापारी वर्गाच्या बैठकीमध्ये कोणता तोडगा निघतो याकडे जेऊरकरांचे लक्ष वेधले आहे