जनता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गिरविले वाहतूक नियमांचे धडे
By : Polticalface Team ,12-01-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी) शिक्षण संस्थेच्या जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स. मोटर वाहन निरीक्षक अहमदनगर मा.सुकन्या क्षेत्रे मॅडम यांनी शासनाकडून आयोजित ११ जानेवारी ते १७ जानेवारी वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांना रस्तेसुरक्षा व वाहतूक नियमाविषयी मार्गदर्शन केले.
विद्यालयाचे प्राचार्य श्री पंडित घोंगडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते . विद्यालयाच्या वतीने प्राचार्यांच्या हस्ते सुकन्या क्षेत्रे मॅडम यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी जनता कन्या विद्यालय, जनता विद्यालय व जुनिअर कॉलेज चे सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी व सेवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी बोलताना सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक क्षेत्रे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना हेल्मेटचा वापर करावा, परवान्याशिवाय गाडी चालू नये, गाडीचा वेग मर्यादित असावा, तसेच रस्त्यावरून चालताना उजव्या बाजूने चालावे असे सांगितले .विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात क्षेत्रे मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. व वाहतुकीचे सर्व नियम समजावून सांगितले त्याचबरोबर अपघातग्रस्त व्यक्तीस मदत करण्याचे आव्हान केले. यावेळी आयोजित केलेल्या सापशिडी खेळातून आपण कशा प्रकारे अपघातातून स्वतःला व इतरांना सुरक्षित ठेवू शकतो, तसेच इतरांना कशाप्रकारे आपल्यामुळे समस्या निर्माण होऊ शकते .याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले सर्व विद्यार्थ्यांनी माहिती लक्षपूर्वक आत्मसात केल्याचे दिसले . यावेळी मुख्य अतिथींच्या हस्ते जिल्हा ,राज्य पातळीवर यश मिळवलेल्या गुणी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
यावेळी दैनिक गावकरीचे वार्ताहर श्री पिटर रणसिंग उपस्थित होते.विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री दत्तात्रय पवार ,जनता विद्यालयाच्या सौ. चाकने मॅडम उपस्थित होते. कलाशिक्षक श्री सुनील शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले तर तालुका क्रीडा समितीचे सचिव श्री . हरिश्चंद्र शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
वाचक क्रमांक :