माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे विशेष प्रयत्नातून कोंढेज गावासाठी जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी एक कोटी 13 लक्ष रुपये मंजूर
By : Polticalface Team ,13-01-2023
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
माजी आमदार नारायण पाटील यांच्या प्रयत्नातून कोंढेज ता. करमाळा गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी एक कोटी तेरा लक्ष रुपये मंजूर झाले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की जलजीवन मिशन मधून आता ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय करण्याचे धोरण शासनाच्या पाणी पुरवठा विभागाने हाती घेतले आहे. या जलजीवन मिशन अंतर्गत करमाळा तालुक्यातील कोंढेज गावासाठी आता कायमस्वरूपी पाणी योजना हाती घेता येणार असून माजी आमदार नारायण पाटील यांच्या प्रयत्नातून या कामासाठी तब्बल एक कोटी तेरा लक्ष रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. कोंढेज ता करमाळा या गावासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर होण्याची ही ग्रामपंचायत इतिहासातील पहिलीच वेळ असून यामुळे आता या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. या कामाची निवीदा प्रक्रिया पूर्ण झाली असून संबंधित विभागाकडे निधी सुद्धा वर्ग करण्यात आला आहे. या निधीतून आता कोंढेज गावठाणासाठी आणखी एक नवीन पाणी साठवण टाकी बांधली जाणार आहे. तसेच कोंढेज येथील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठ्या असलेल्या आदलिंग-ननवरे वस्तीवर सुद्धा एक नवीन पाणी साठवण टाकी व वस्तीमधील प्रत्येक घरात नळ व पाईपलाईन द्वारे पाणी पोहोच करण्यात येणार आहे. तसेच कोंढेज गावठाण मधील सर्व भागातील जुनी खराब जल वाहीनी यंत्रणा बदलून नवीन पाईपलाईन टाकून सक्षम पाणीपुरवठा योजना अंमलात येणार आहे. सध्या गावातील आडामधून संपुर्ण गावास पिण्याचे पाणी दिले जात असले तरी भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून आता गावासाठी नवीन स्वतंत्र विहीर निर्माण केली जाणार आहे. कोंढेज ता करमाळा हे गाव आता पिण्याच्या पाण्यासाठी स्वावलंबी होणार असून लवकरच या योजनेच्या कामाचे भूमिपूजन माजी आमदार नारायण पाटील यांच्या शुभहस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती सरपंच सौ अश्विनी सव्वाशे यांनी दिली आहे. माजी सरपंच व विद्यमान ग्रा प सदस्या सौ छाया राऊत व उपसरपंच शहाजी राऊत यांच्या कालावधीत या कामाचा पाठपुरावा करण्यात आला. ग्रा प सदस्य गोविंद लोंढे,सदस्या सौ सारीका आदलिंग, सौ दाळूबाई बादल यांनी सुद्धा या योजनेस निधी मिळावा असा आग्रह माजी आमदार नारायण पाटील यांच्या कडे धरला होता.यामुळेच ही योजना आता अमंलात येत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी माजी आमदार नारायण पाटील गटाचे मा. सरपंच नागनाथ आदलिंग, मा सरपंच दादासाहेब लोंढे-पाटील, मा उपसरपंच नानासाहेब आदलिंग, मधूकर साबळे, संजय लोंढे, आबासाहेब गायकवाड, गणेश सालसकर, निवास सालसकर, श्रीनिवास महामुनी, दादासाहेब माने, बबन माने, संतोष माने, रामभाऊ सुतार, निलेश राऊत, रमेश उंबरे,शिवाजी पंढरपुरे, बाळासाहेब पंढरपुरे, रेवणनाथ आरणे, इकबाल शेख, रज्जाक शेख, अनिल साळवे, संग्राम राऊत, अमीन तांबोळी, जालिंदर माने, चंद्रकांत माने, उमेश चव्हाण, रमेश वाघमोडे आदि उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.