By : Polticalface Team ,14-01-2023
केम ता.करमाळा येथे राजमाता जिजाऊमाँसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.या जयंती उत्सवात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात प्रा.डाॅ.चौधरी बोलत होते.शेतकरी चळवळीशी निगडीत असलेले आदर्श गोपालक परमेश्वर तळेकर यांनी आयोजित केलेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सर्जेराव बिचीतकर होते.यावेळी व्यासपीठावर दत्तात्रय फराडे (टेंभुर्णी), सत्यवान सुर्यवंशी,सुनिल तळेकर (जेऊर ), बिभिषण देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
राजमाता जिजाऊ यांच्या जीवनातील संघर्षमय प्रसंग सांगून पुढे बोलताना डाॅ.चौधरी म्हणाले की,चुकीच्या रूढी-परंपरांना फाटा देवून जिजाऊ माँसाहेब यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत सर्वांनी एकत्र आले पाहिजे. आपापसातील मतभेद बाजूला ठेवून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतींना घडविणा-या जिजाऊ माँसाहेबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल केली पाहिजे.येणारा काळ अत्यंत कठीण असणार आहे. या नव्या काळातील नवनवी आव्हाने पेलताना दैवावर विसंबून न राहता प्रयत्नपूर्वक अडचणींवर मात करावी लागेल. प्रयत्नवाद शिकविणारी आपली वारकरी परंपरा अभ्यासपूर्वक व सखोलपणे समजून घेण्याची कधी नव्हे एवढी गरज निर्माण झालेली आहे पण सद्यस्थितीत आपण संत तुकारामांनी केलेल्या उपदेशाच्या विरोधात चाललो आहोत अशी खंतही प्रा.चौधरी यांनी व्यक्त केली.
परमेश्वर तळेकर यांच्या कार्याची व निरपेक्ष सेवेची दखल घेऊन गाईचे महत्त्व समाजाला पटवून देण्यासाठी परमेश्वर तळेकर यांनी आता कार्यक्षेत्र मर्यादित न ठेवता जिथे आवश्यक आहे तिथे जाऊन आपले अनुभव लोकांना सांगणे गरजेचे आहे.शासनानेही तळेकर यांच्या या कामाची दखल घेऊन गोधन वाढवण्यासाठी काही महत्वकांक्षी योजनेची रुजवात करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कु.सानिका तळेकर हिने गायलेल्या जिजाऊ गीत गायनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.मान्यवरांचे सत्कार संयोजक परमेश्वर तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आदर्श गोपालक, आदर्श गोसेवक व बैलजोडी जोपासलेल्या शेतकऱ्यांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात १५ बैल जोडीधारकांचा व १७ गोपालकांचा सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर जेष्ठ व वयोवृद्ध आधारवड गं.भा.हौसाबाई(आक्का)तळेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.या समारंभास केम परिसरातील युवकवर्ग व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष