शिवराज राक्षे ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी

By : Polticalface Team ,14-01-2023

शिवराज राक्षे ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी

पुणे : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी अखेर मिळाला आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा किताब शिवराज राक्षे यानं आपल्या नावावर केलाय. पुण्यातील मामासाहेब मोहोळ मैदानावर झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्र केसरीचा मानकरी मिळाला आहे.

पुण्यातील मामासाहेब मोहळ मैदानावर आज 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या फायनलचा थरार पाहायला मिळाला. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. अनेक चुरशीच्या लढती आतापर्यंत पाहायला मिळाल्या.

आज झालेली अंतिम लढत देखील अत्यंत चुरशीची झाल्याची पाहायला मिळाली. मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या स्पर्धेचा आज अखेर महाराष्ट्र केसरीचा मानकरी मिळाला आहे. या गदेचा मानकरी कोण ठरणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं.

माती विभागातून सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात सेमीफायनलची कुस्ती झाली. माती विभागामध्ये महेंद्र गायकवाड यांनी बाजी मारली आहे. महेंद्र यांनी सिकंदरवर मात करत सेमीफायनल जिंकली. तर मॅटवरील सेमीफायनल लढतीमध्ये हर्षवर्धन सदगीर विरुद्ध शिवराज राक्षे अशी लढत पाहायला मिळाली, त्यामध्ये शिवराज राक्षे यानं हर्षवर्धन सदगीरवर विजय मिळवलाय.

आज सायंकाळी माती आणि मॅट विभागातील दोन अंतीम लढती खेळवण्यात आल्या. यातील विजेत्यांमधून महाराष्ट्र केसरीची अंतीम लढत झाली. माती विभागातून महेंद्र गायकवाड आणि मॅट विभागातील शिवराज राक्षे यांच्यात फायनल स्पर्धा झाली त्यात शिवराज राक्षेनं बाजी मारलीय
प्रकाश म्हस्के
संपादक

कोहलेर पावर इंडिया कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी (शुगर) ५० कॉम्प्युटर, लॅपटॉप, वॉटर कुलर व मोठे झेरॉक्स मशीन भेट.

स्वर्गीय आमदार सुभाष आण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहे. आमदार राहुल कुल.

एनडीए सरकारच्या वाचाळवीरांवर तात्काळ गुन्हे दाखल करा:- युवक काँग्रेस

सहकार महर्षी बापूंनी सहकाराच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम केला - प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी सोलापुरात! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा; 40,000 महिलांना कार्यक्रमासाठी आणायला 400 बसगाड्या

स्वामी चिंचोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

शरद पवारही माझ्याकडे बघून हसू लागले; अशोक सराफांनी सांगितला सुप्रिया सुळेंच्या लग्नातला विनोदी किस्सा

स्वर्गीय सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या वांगदरी येथील अंबिका मातेचे मंदिरात व्याख्यान        

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राज्य निरीक्षक पदी भानुदास वाबळे यांची नियुक्ती

यवत येथील गणेश विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्ते झिंग झिंगाट. मंडळांच्या प्रमुखांनमुळं विसर्जन पार. पोलीस प्रशासनाचे नियम धाब्यावर. मागच्या दाराने दारु विक्री

गिरीम गावच्या सरपंचपदी संगिता किसन मदने (पाटील)यांची बिनविरोध निवड

पो. कॉ.ज्ञानेश्वर मोरेच्या रुपात खाकीतला एक कोहिनूर हरपला

अजितदादांनी या मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद

इंदापूरमध्ये शरद पवारांकडून उमेदवारीसाठी आप्पासाहेब जगदाळे यांच्या समर्थकांच्या हालचाली.! संकटसमई धावून आलेल्या आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी मिळणार..?

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात पहा तारीख आणि वेळ

अरविंद केजरीवाल देणार राजीनामा, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण होणार विराजमान

पितृसेवा म्हणजेच भगवंताची उत्तम सेवा होय -सोमनाथ महाराज बारगळ

श्री व्यंकनाथ विद्यालयात शिक्षक- पालक मेळावा उत्साहात संपन्न