महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदरवर अन्याय? सोशल मीडियावर जोरदार चर्चांना उधान

By : Polticalface Team ,15-01-2023

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदरवर अन्याय? सोशल मीडियावर जोरदार चर्चांना उधान पुणे : येथील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत यंदाची मानाची गदा शिवराज राक्षे या पैलवानानं पटकावलीय. अखेरच्या सामन्यात शिवराज राक्षेनं सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला काही मिनिटातच चितपट करुन महाराष्ट्र केसरी किताबावर आपलं नाव कोरलंय. पण दुसरीकडं सोशल मीडियावर एक वेगळ्याच चर्चांना उधान आलंय. पैलवान सिकंदर शेखवर अन्याय झाल्याची भावना सोशल मीडियावर अनेकांकडून व्यक्त केली जात आहे.

झालं असं की, माती विभागातील सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात सेमी फायनलचा सामना पार पडला. हा सामना अतिशय थरारक असा पाहायला मिळाला. महेंद्र गायकवाडचा विजय झाला. पण सोशल मीडियावर सिकंदरवर अन्याय झाल्याची जोरदार चर्चा रंगलीय.

सेमी फायनलमध्ये महेंद्र गायकवाडने तीन मिनिटांच्या पहिल्या फेरीत एक गुण घेत आघाडी मिळवली. महेंद्रने आघाडी घेतल्यावर सिकंदरनं प्रतीडाव टाकत दोन गुण पटकावले. पहिल्या फेरीत सिकंदर शेख 2-1 गुणांनी आघाडी घेतली होती. पुढच्या फेरीत महेंद्रने 4 गुण मिळवत आघाडी घेत सिकंदवर 5-4 अशी आघाडी घेतली. पण महेंद्रनं लावलेली बाहेरील डांग हा डाव व्यवस्थीत झाला नव्हता, सिकंदर डेन्जर पोझिशनला नव्हता मग चार गुण कशाचे दिले? असे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जाताहेत.

सिकंदर आणि महेंद्र यांच्यामध्ये एकेक गुणासाठी चढाओढ चालू असताना शेवटच्या मिनिटाला चांगली झटापाट सुरु होती. त्यात अखेरीस महेंद्र गायकवाडनं एक गुण मिळवत कुस्ती जिंकली. या निर्णयावरुन सोशल मीडियावर आक्षेप घेतला जात आहे.

एका नेटकऱ्यानं सोशल मीडियावर म्हटलंय की, सिकंदरच्या कुस्ती निर्णयात न्यायी भूमिका घेतली गेली नाही. पंचकमिटीवर काही आक्षेप घेण्यात आलेत. खरंच सिकंदरच्या प्रतिस्पर्ध्याला चार गुण देण्याची गरज होती का? ते गुण घाईनं जाहीर करण्याचा प्रयत्न दिनेश गुंड यांनी का केला? सिकंदरला टांग मारली पण तो पाठीवर पडला का? अथवा त्याचा एखादा खांदा तरी मैदानाला टेकला का? दोन्ही अँगलनं कुस्तीचा रिप्ले मोठ्या स्क्रीनवर का दाखवला गेला नाही?

सिकंदरच्या कोचला तात्काळ हाकलून लावत का कुस्ती सुरु केली गेली? हा व्हिडिओ प्रेक्षकांमधून आलाय. यात सर्व स्पष्ट होतंय. बाकी सिकंदर हरला हा मुद्दा नाही. त्यानं भारत जिंकलाय. फक्त न्यायदानात चूक होऊ नये आणि ती करुही नये, अशा प्रकारच्या भावना एका नेटकऱ्यानं व्यक्त केल्या आहेत

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी