By : Polticalface Team ,15-01-2023
दरम्यान, साडीने पेट घेतल्यावर तत्काळ आग विझवण्यात आली. यामध्ये सुळे यांना कोणतीही इजा झालेली नाही.मात्र, सुळे यांच्या साडीने पेट घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
खासदार सुळे या पुण्यातील हिंजवडीत कराटे प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमात दिपप्रज्ज्वलन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालताना सुळे यांच्या साडीने अचानक पेट घेतल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. साडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच साडीला लागलेली आग तत्काळ विझवण्यात आली. ही घटना सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास घडली.
दरम्यान, या घटनेमुळे सुळेंच्या दैनंदिन नियोजित कार्यक्रमात कुठलाही बदल करण्यात आला नसून त्या पुढील कार्यक्रमांना जाणार असल्याची माहिती मिळात आहे. सुप्रिया सुळे यांचं आवाहन आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील हिंजवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कराटे स्पर्धेचे उद्घाटन करत असताना अनवधानाने साडीने पेट घेतला. पण वेळीच ती आग आटोक्यात आणण्यात आली.
आमचे हितचिंतक, नागरीक, कार्यकर्ते व पदाधिकारी यांना माझी विनंती आहे की, मी सुरक्षित असून कृपया कुणीही काळजी करु नये. आपण दाखवित असलेले प्रेम, काळजी माझ्यासाठी मोलाचे आहे. आपणा सर्वांचे मनापासून आभार वाचक क्रमांक :