नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट, भाजपचा धनराज विसपुतेंना पाठिंबा?

By : Polticalface Team ,15-01-2023

नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट, भाजपचा धनराज विसपुतेंना पाठिंबा? नाशिक : नाशिक पदवीधर मतदासंघात दररोज एक नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. आज नाशिक मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज केलेले धनराज विसपुते यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अपक्ष उमदेवार धनराज विसपुते यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन भाजपकडून आपल्याला पाठिंबा मिळावा, अशी मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. अद्याप भाजपकडून कोणत्याही उमदेवाराला अधिकृतपणे जाहीर पाठिंबा देण्यात आलेला नाही. मात्र, भाजपकडून सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. अशातच आणखी एक अपक्ष उमेदवार धनराज विसपुते यांनी पाठिंब्यासाठी विनंती केल्याने अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाकडून जाहीरणे पाठिंबा मिळत असल्याने निवडणुकीत कोणाची वर्णी लागणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

नाशिक मतदारसंघात एकूण दहा अपक्षांच्या उमेदवारीचे अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेयं. त्यापैकी सत्यजित तांबे हे आपण कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचा दावा करीत आहेत. तर कॉंग्रेसकडून हा दावा फेटाळण्यात येत आहे.

कॉंग्रेसकडून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी माघार घेत मुलगा सत्यजित तांबेचा अपक्ष अर्ज भरला.

दरम्यान, ज्यावेळी सत्यजित तांबेंनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला आणि दुसरीकडे सत्यजित तांबेंनी पाठिंबा मागितल्यास आम्ही त्यांना पाठिंबा देणार असल्याचं भाजपकडून जाहीर करण्यात आलं. तेव्हा निवडणुकीत तांबे बाजी मारणार हे नक्की झालं होतं. अद्याप भाजपकडून कोणत्याही उमेदवाराला अधिकृतपणे पाठिंबा देण्यात आला नाही.

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यात आल्याने आता या निवडणुकीत पाटील यांनी तांबे यांना ललकारल्याची परिस्थिती दिसून येत आहे. आता पुढे आणखी नवीन कोणता ट्विस्ट येणार? निवडणुकीत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता सर्वांना लागलीय. आता

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी