श्री छत्रपती शिवाजी कॉलेज मधील ५ विद्यार्थ्यांची औषध कंपनीत नोकरीसाठी निवड.
By : Polticalface Team ,16-01-2023
लिंपणगाव( प्रतिनिधी)-- श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील एम.एस्सी व बी.एस्सी (रसायनशास्त्र) उत्तीर्ण ५ विद्यार्थ्यांची कुरकुंभ येथील औषध कंपनीत नोकरीसाठी निवड झाल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सुर्यवंशी यांनी दिली.
दिनांक ४ व १३ जानेवारी २०२३ रोजी छत्रपती महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल व रसायनशास्र विभाग आणि कुरकुंभ येथील क्लिनसायन्स लॅब, लवेंडर फार्मा व सोहम हेल्थकेअर लि. यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्पस इंटरव्ह्यू चे आयोजन करण्यात आले होते. रिसर्च आणि प्रॉडक्शन विभागातील जागांकरिता लेखी परीक्षा आणि प्रत्यक्ष मुलाखती मधून अमर बिटके, प्रतिक खामकर, स्वप्नील नलगे, निखिल भोसले व अमित थोरात या विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली.
या मुलाखतीच्या यशस्वीतेसाठी प्लेसमेंट सेल विभागातील प्रा.विलास सुद्रिक यांनी विशेष मेहनत घेतली तर इतर सदस्य प्रा.विजय इथापे आणि प्रा. प्रविण नागवडे यांनी खंबीर साथ दिली.
आदरणीय राजेंद्र दादा नागवडे आणि विश्वस्त मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम सुरू आहेत. कॉलेजच्या प्लेसमेंट सेल विभागामार्फत १४ विविध आस्थापनांसोबत सामंजस्य करार संपन्न झाले आहेत. पुढेही या नवीन वर्षात कॅम्पसची आणि कराराची ही परंपरा कायम राहणार असल्याचे कॉलेजचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र (दादा) नागवडे, नागवडे कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस, सौ.अनुराधाताई नागवडे, दिपकशेठ नागवडे, सेक्रेटरी, निरीक्षक सचिनराव लगड, सर्व विश्वस्थ, प्लेसमेंट सेल, रसायनशास्त्र विभागप्रमुख व कॉलेजमधील सर्व कर्मचारी वृदांनी अभिनंदन केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी